ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्‍टरांना सुसंधी

नेत्वा धुरी
शनिवार, 22 एप्रिल 2017

'नीट' परीक्षेत देणार 30 टक्के गुण
मुंबई - ग्रामीण आणि दुर्गम भागांत आरोग्य सेवा देण्यास डॉक्‍टर पुढे येत नाहीत. हा अनुभव असल्याने आरोग्य विभागाने या भागात व्यवसाय करणाऱ्या डॉक्‍टरांना पदव्युत्तर शिक्षणाच्या "नीट' परीक्षेत 30 टक्‍क्‍यांपर्यंत अधिक गुण देण्याची तयारी दर्शवली असून. 2018 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

'नीट' परीक्षेत देणार 30 टक्के गुण
मुंबई - ग्रामीण आणि दुर्गम भागांत आरोग्य सेवा देण्यास डॉक्‍टर पुढे येत नाहीत. हा अनुभव असल्याने आरोग्य विभागाने या भागात व्यवसाय करणाऱ्या डॉक्‍टरांना पदव्युत्तर शिक्षणाच्या "नीट' परीक्षेत 30 टक्‍क्‍यांपर्यंत अधिक गुण देण्याची तयारी दर्शवली असून. 2018 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

ग्रामीण भागातील डॉक्‍टरांच्या घटणाऱ्या संख्येबाबत गेल्या वर्षी राज्य मानवी हक्क आयोगाच्या सुनावणीच्या वेळी आरोग्य संचालनालयाने कर्नाटक पॅटर्न राबवणार असल्याची माहिती दिली होती; परंतु ही योजना सामान्य प्रशासन विभागाने नाकारल्याने आता नवा पॅटर्न अमलात आणण्याचा आरोग्य संचालनालयाचा विचार आहे.

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी आता "नीट' परीक्षा देणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी एमबीबीएस डॉक्‍टर असताना ग्रामीण भागामध्ये रुग्णसेवा दिल्यास त्याबद्दल "नीट' परीक्षेत 30 टक्के अधिक गुण देण्याचा हा प्रस्ताव आहे.

हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, 2018 पासून डॉक्‍टरांसाठी उपलब्ध करून देण्याचा आरोग्य विभागाचा विचार आहे, अशी माहिती आरोग्य संचालनालयाचे संचालक सतीश पवार यांनी "सकाळ'ला दिली.

"नीट' परीक्षेत मार्कांची वाढ करताना अ, ब, क श्रेणी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
- "अ' श्रेणी - या श्रेणीत विद्यार्थी अतिदुर्गम भागांत तीन वर्षे सेवा देत असल्यास त्यांना "नीट' परीक्षेत 30 टक्के गुण दिले जातील.
- "ब' श्रेणी - या श्रेणीत विद्यार्थी दुर्गम भागांत तीन वर्षे सेवा देत असल्यास त्यांना 20 टक्के गुण दिले जातील.
- "क' श्रेणी - या श्रेणीतील विद्यार्थी ग्रामीण भागांत तीन वर्षांसाठी रुग्णसेवा देत असल्यास त्यांना 10 टक्के गुण दिले जातील.

Web Title: neet exam 30 gives to rural area doctor service