ख्रिश्चन समाजाकड़े सरकारचे दुर्लक्ष - आशिष शिंदे

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुंबई : महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष शेख आराफात यांची अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी भेट घेत ख्रिश्चन समाजाकड़े सरकारचे दुर्लक्ष झाल्याबाबत तक्रार करीत नाराजी व्यक्त केली. शासनाचे ख्रिस्ती समाजाकडे खूप मोठे दुर्लक्ष झालेले असून, आझाद मैदान, मुंबई ते जतंरमंतर दिल्ली पर्यंत आंदोलने करून देखील शासनाने ख्रिश्चन समाजाची एकही मागणी मान्य केलेली नाही, केवळ आश्वासने दिली.

मुंबई : महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष शेख आराफात यांची अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी भेट घेत ख्रिश्चन समाजाकड़े सरकारचे दुर्लक्ष झाल्याबाबत तक्रार करीत नाराजी व्यक्त केली. शासनाचे ख्रिस्ती समाजाकडे खूप मोठे दुर्लक्ष झालेले असून, आझाद मैदान, मुंबई ते जतंरमंतर दिल्ली पर्यंत आंदोलने करून देखील शासनाने ख्रिश्चन समाजाची एकही मागणी मान्य केलेली नाही, केवळ आश्वासने दिली. अल्पसंख्यांक राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी मंत्रालयात बैठक घेतली परंतु कोणत्याही मागण्या मान्य केलेल्या नाहीत.अशा स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.यावर अध्यक्ष शेख आराफात यांनी सर्व मागण्या ऐकून घेतल्या व यावर लवकरच कारवाई केली जाईल व आयोगाच्या वतीने आपणास कळविले जाईल असे सांगितले.

यावेळी शिष्टमंडळात अमृत सोनावणे, अशोक थोरात, किशोर शिंदे, मरियन रेड्डी, वसंत शिंदे हे समाजाच्या वतीने उपस्थित होते.

नेमक्या काय आहेत ख्रिश्चन समाजाच्या मागण्या.
1) भारतरत्न मदर तेरेसा यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावी. मदर तेरेसा यांचा जन्मदिवस सेवा दिन म्हणून पाळण्यात यावा. तसेच लहान मोठ्या उद्योगासाठी आर्थिक सहाय्य देण्यात यावे. सर्व ख्रिस्ती विद्यार्थ्यांना सरसकट स्काँलरशीप देण्यात यावी.
2) ख्रिस्ती समाजासाठी प्रत्येक गावात कब्रस्थानासाठी जागा द्यावी व जून्या कब्रस्थानाचा विकास करावा.तसेच इतर धर्मिय स्थळाप्रमाणे चर्चच्या विकासासाठी विशेष निधी द्यावा.
3) चर्च, फादर, नन्स, पास्टर, ख्रिश्चन स्कूल, दवाखाने यावर हल्ले करणारावर अजामीन पाञ गुन्हे दाखल करणे. व याअगोदर झालेल्या हल्ल्यांचा शोध लावून गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणे.
4) ख्रिस्ती धर्मामध्ये इस्ञाएल या देशाला पवित्र भूमी म्हणून एक अनन्यसाधारण महत्त्व आहे.या देशाला भेट देणाऱ्या भाविकांना अनुदान देण्यात यावे.
5) विधवा, अनाथ व वंचितांसाठी आयुष्य वेचलेल्या पंडिता रमाबाई यांना भारतरत्न पुरस्कारासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्र सरकार ला शिफारस करण्यात यावी.
6)  ख्रिस्ती समाजाला इ.मा.व (OBC) प्रमाणपत्र व वैध्यता प्रमाणपत्र विनाअट तात्काळ द्यावीत. नौकरीमध्ये विशेष आरक्षण द्यावे.
7) महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजामध्ये रेव्ह.ना.वा.टिळक यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यांनी साहित्य क्षेत्रात भरीव असे लिखाण केले आहे.सन 2019 मध्ये त्यांची 100 वा स्मृती दिन (पुण्य तिथी) होणार असून जेष्ठ साहित्यिकाचा सन्मान सरकार कडून करण्यात यावा व त्यांच्या नावाने साहित्य पुरस्कार देण्यात यावेत
8) ख्रिस्ती समाजासाठी राज्यसभा व विधानपरिषद विशेष बाब म्हणून प्रतिनिधित्व द्यावे. (उदा.खेळाडू व कलाकार) तसेच अनु. जाती, जमाती व महिला प्रमाणे ख्रिस्ती  समाजासाठी ही विधानसभा व विधानपरिषदे मध्ये पाच जागा राखीव असाव्यात.
09) स्वातंत्र्यपूर्व काळातील ख्रिस्ती मालमत्तेचे रक्षण करणारा कायदा करून खरेदी व विक्री वर बंदी आणावी व ख्रिस्ती मालमत्ता बोर्ड ची स्थापना करणे.
10) महाराष्ट्र अल्पसंख्खाक आयोग व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ सदस्यपदी ख्रिश्चन प्रतिनीधी कार्यकारी मंडळात घेणे.

Web Title: The neglect towords Christian community - Ashish Shinde