दिवसा टेहळणी अन् रात्री घरफोडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

नालासोपारा : दिवस-रात्री टेहळणी करून घरफोडी करणाऱ्या सराईत नेपाळी टोळीचा विरारमध्ये भांडाफोड झाला आहे. अर्नाळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळीतील चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ लाख ४४ हजार ६०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. 

नालासोपारा : दिवस-रात्री टेहळणी करून घरफोडी करणाऱ्या सराईत नेपाळी टोळीचा विरारमध्ये भांडाफोड झाला आहे. अर्नाळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने या टोळीतील चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून २ लाख ४४ हजार ६०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. 

नियम मोडाल तर दंडुका बसणार...

विरारच्या आगाशी परिसरातील दीपक ठाकूर यांच्या घरात २२ ते २३ जानेवारीला घरफोडी करून २ लाख ८४ हजार ६०० रुपये किमतीचे सोने-चांदीने दागिने घेऊन चोरटे फरार झाले होते. याबाबत अर्नाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास करत पोलिसांनी या नेपाळी गॅंगचा भांडाफोड केला.

निसर्गरम्य काशिदमध्ये याची आहे दहशत...

वसई, विरार, नालासोपारा, ठाणे, उल्हासनगर, मुंबई परिसरात या टोळीवर अनेक घरफोडी, चोरी, सोनसाखळी चोरीचे गुन्हेही दाखल असल्याचे विरारच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रेणुका बगाडे यांनी सांगितले आहे. 

रोशन पदम शाही (वय २४), मानबहाद्दूर उपेंद्र ऊर्फ सहवीर सोनार, दीपक ऊर्फ राजू ऊर्फ रतन अमरबहाद्दूर शहा (साही), दीपक किरण थापा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून त्यांना ठाणे रबाळे येथून अटक करण्यात आली. हे सर्व नेपाळचे आहेत. त्यांची मोठी टोळी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरात कार्यरत आहे. 

विविध ठिकाणी गुन्हे दाखल
छोट्या-मोठ्या कामाचा बहाणा करून दिवस-रात्र टेहळणी करून, बंद घर हेरून त्या घराचे कडी-कोयंडा तोडून घरातील सोने-चांदीचे दागिने घेऊन हे चोरटे फरारी होत होते. यांच्यावर अर्नाळा, ठाणे, उल्हासनगर मध्यवर्ती पोलिस ठाणे, वसई-माणिकपूर पोलिस ठाणे या ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nepali gang arrested by Arnala police