

Sadiq Kalia encounter 1999
ESakal
गुन्हेगारीच्या जगात असे म्हटले जाते की अंडरवर्ल्ड कधीही विसरत नाही. मुंबईत हे पुन्हा एकदा खरे ठरले आहे. मुंबईत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. ज्यात एका तरुणाने सुमारे तीन दशकांपूर्वीच्या एका चकमकीचा बदला घेण्यासाठी एका कथित खबऱ्याची हत्या केली. मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणात तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराला नागपूरहून अटक केली.