माथेरानची राणी शिरस्ता मोडला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

नेरळ - अवघड घाट आणि वळणावळणांचा मार्ग यामुळे ब्रिटिश काळात सुरू झालेली माथेरान मिनी ट्रेन सूर्यास्तानंतर एकदाही धावली नव्हती. शंभरहून अधिक वर्षांचा हा शिरस्ता अखेर मोडला आहे. नव्या पर्यटन हंगामानिमित्त आजपासून दर आठवड्याला सुरू झालेल्या गाडीला रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर ही माथेरानची राणी 100 मीटर अंतर धावली.
Web Title: neral news matheranachi rani mini train