रस्ता भरकटलेल्या 17 ट्रेकरना शोधले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जानेवारी 2018

नेरळ - कर्जत व खालापूर या तालुक्‍यांच्या सीमेवरील सोनगिरीच्या जंगलातच भरकटत राहिलेल्या 17 ट्रेकरना कर्जत पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधले.

नेरळ - कर्जत व खालापूर या तालुक्‍यांच्या सीमेवरील सोनगिरीच्या जंगलातच भरकटत राहिलेल्या 17 ट्रेकरना कर्जत पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधले.

सोनगिरीच्या शिवकालीन किल्ल्यावर जाण्यासाठी उल्हासनगर, ठाणे, ऐरोली, विक्रोळी, बोरिवली, डोंबिवली, उरण परिसरातून शनिवारी (ता. 20) 17 ट्रेकर आले होते. सायंकाळपर्यंत किल्ल्यावर पोचणे साध्य न झाल्याने घरी जाण्यास निघालेले हे तरुण परतीची वाट सापडत नसल्याने भरकटले. जंगलाचा भाग असल्याने मोबाईलच्या नेटवर्कमध्ये अडचणी येत होत्या; परंतु एका तरुणाला 100 क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधण्यात यश मिळाले. त्याने आपली अडचण पोलिसांना सांगितली. त्यानंतर कर्जत पोलिस यंत्रणेने तत्काळ हालचाली केल्या. कर्जत पोलिस ठाण्याचे पथक सोनगिरी जंगलात शोध घेण्यास निघाले. यासाठी त्यांनी आवळस, केळवली व पळसदरी वाडी येथील ग्रामस्थांची मदत घेतली होती. शेवटी दीड तासानंतर या शोधमोहिमेला यश आले.

Web Title: neral news police search 17 trackers