नेरूळ-खारकोपर लोकल आजपासून

नवी मुंबई - लोकलची शनिवारी अंतिम चाचणी घेण्यात आली.
नवी मुंबई - लोकलची शनिवारी अंतिम चाचणी घेण्यात आली.

नवी मुंबई - सिडकोच्या नेरूळ-उरण या महत्त्वाकांक्षी रेल्वेमार्गाचे रविवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात येणार आहे. सध्या नेरूळ ते खारकोपर अशी लोकल धावणार आहे. लवकरच उरणपर्यंत ही सेवा सुरू करण्याचा मनोदय सिडको प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

वाशी-पनवेल आणि ठाणे-नेरूळ या दोन रेल्वे मार्गानंतर नेरूळ-उरण रेल्वेमार्ग सुरू करण्याचे सिडकोच्या नियोजनात होते. सध्या नवी मुंबईतून उरण व जेएनपीटीकडे जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव असल्याने या भागात कामानिमित्ताने जाणाऱ्या नोकरदार मंडळींची मोठी गैरसोय होत होती. ती आता दूर होणार आहे. नेरूळ ते खारकोपरदरम्यान उलवा आणि बामणडोंगरी या स्थानकांचे काम पूर्ण झाले असल्याने सध्या नेरूळ-खारकोपरदरम्यान लोकल सुरू करण्यात येत आहे. रविवारी सकाळी ११ वाजता रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खारकोपर स्थानकावर खारकोपर-नेरूळ या लोकलला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर सोमवारपासून नेरूळ-खारकोपर आणि खारकोपर-सीबीडीदरम्यान लोकलच्या २०-२० फेऱ्या नियमित सुरू होतील.

उलवेकरांचा प्रवास सुखकर होणार
नेरूळ ते उलवे असा दर दिवशी बस व रिक्षाने प्रवास करणाऱ्या रहिवाशांनी या सेवेमुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रोज बस व रिक्षाने नेरूळ ते उलवे प्रवास करताना जादा पैसे मोजावे लागत होते. तसेच, बेलापूर किल्ला जंक्‍शन येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते; मात्र आता नेरूळ-खारकोपर रेल्वेमुळे उलवेकरांचा प्रवास सुखकर होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com