

NESCO Drugs Case in Mumbai
Esakal
Drugs Case in Mumbai: गोरेगावात नेस्को मैदानात लाइव्ह कॉन्सर्टवेळी ड्रग्ज प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणी पोलिसांनी कॉन्सर्टच्या आयोजकासह पाच जणांना अटक केलीय. मात्र गोरेगावसारख्या ठिकाणी उघडपणे ड्रग्जचा वापर आणि लाइव्ह कॉन्सर्टमध्ये हजर असलेल्या ८० टक्के जणांनी ड्रग्ज घेतलं होतं अशी माहिती समोर येतेय. या लाइव्ह कॉन्सर्टमधील सर्व विद्यार्थी हे एमबीए महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.