esakal | अनिल परबांना नेटकरी विचारतायत, "श्रीमंतासाठी वेगळा आणि गोरगरीबांसाठी वेगळा न्याय का ?"
sakal

बोलून बातमी शोधा

अनिल परबांना नेटकरी विचारतायत, "श्रीमंतासाठी वेगळा आणि गोरगरीबांसाठी वेगळा न्याय का ?"

कोट्यासाठी एसटी, गरिबांचे काय, ट्विटरवर सामान्य लोकांनी केला प्रश्नांचा भडीमार

अनिल परबांना नेटकरी विचारतायत, "श्रीमंतासाठी वेगळा आणि गोरगरीबांसाठी वेगळा न्याय का ?"

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : राजस्थानच्या कोटा इथं लॉकडाऊनमुळे अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. राज्य सरकारने अडकलेल्या विद्यार्थ्य़ांसाठी 72 बसेस रवाना केल्या. तर काही विद्यार्थ्यांनी अन्य मार्गाने पासेस मिळवून आपआपले घरही गाठले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे देशात ठिकठिकाणी फसलेल्या विद्यार्थी, कामगारांच काय ? अशे प्रश्न आता सर्वसामान्यांनी विचारायला सुरुवात केले आहे.

राजस्थानचं कोटा शहर हे मेडीकल, इंजीनीयरींगची प्रवेश परिक्षेसाठीच्या शिकवणी क्लासेसचे देशातील मोठे केंद्र आहे. परिक्षेत हमखास मिळणाऱ्या यशामुळे देशभरातून विद्यार्थी इथल्या महागड्या क्लासेसमध्ये शिकायला येतात. मात्र या क्लासेसची फी सुखवस्तू घरातील मुलांना परवडण्यासारखी आहे. त्यामुळे राज्यातून कोटा इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अधिकारी, व्यवसायिक, नेत्यांचे मुल मोठ्या प्रमाणात आहे. या पालकांनी अनेक मार्गाने या प्रश्नाचा पाठपुरावा केला. त्यानंतर अखेरीस राज्य सरकारने  या मुलांना आणण्यासाठी 72 बसेस  कोट्यासाठी रवाना केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठीची 'गुड न्यूज' लवकरच येणार, राजकीय सूत्र सांगतायत...

परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती देण्यासाठी ट्विट केले होते. या ट्विटवर सर्वथऱातून वेगवेगळ्या प्रतिक्रीया येत आहेत. श्रीमंतासाठी वेगळा आणि गोरगरीबांसाठी वेगळा न्याय का ? असा संतप्त प्रश्नही अनेकांनी विचारला आहे. केरळमध्ये साऊथ रेल्वे डिव्हीजन येथे महाराष्ट्रातील सुमारे 1000 शिकाऊ उमेदवार अडकले आहे. त्यांना परत आणण्यासठी सरकारने मदत करावी अशी विनंती खासदार रक्षा खडसे यानी केली आहे. तर पुण्यातल्या एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय पाप केले की असा तिखट प्रश्नही एका निल गायकवाड नावाच्या विद्यार्थ्याने मंत्रीमहोदयांना केला आहे.
राज्यात गरोदर मातांना रुग्णवाहीका मिळत नाही, देशभरात रोजगारासाठी गेलेले शेकडो मजूर, कर्मचारी अडकले आहे. वाहतूक ठप्प असल्यामुळे अनेक कामगार शेकडो किलोमीटर पायपीट करुन घरी निघाले आहे. सरकार कोट्यासाठी बसेस पाठवत आहे  तर मजुर आणि हातावर काम करणाऱ्या लोकांचाही मानवतावादी भुमिकेतून विचार करावा असा सल्लाही एकाने दिला आहे.

घाबरू नका, लवकरच भारतात उपलब्ध होईल कोरोनाची लस...

परिवहन मंत्र्यांच्या ट्विट पोस्टवरील प्रतिक्रीया

  • राज्यातून चेन्नई येथे रेल्वे अप्रेन्टीससाठी आलेलो 100 विद्यार्थी अडकले आहे. लाॅकडाऊन असल्याने किराणा सुद्धा मिळत नसल्याने फार बिकट परिस्थिती आहे. आम्हालाही राज्यात येण्याची परवानगी द्या - रोशन पाटील
  • महाराष्ट्रातील मुले तामीळनाडू मध्ये साऊथ रेल्वे अप्रेन्टशीपसाठी गेलेले 2000 विद्यार्थी अडकले आहे. त्यांना ही घरी येण्याची सोय करावी - नितीन भालेराव
  • गुजरात, खांन्देशात लाखांच्यावर लोक अडकली आहे. जे जळगांव, धुळे जिल्ह्यातील आहे. त्यांना परत आणण्यासाठी सरकारने मदत करावी - सुरेश भामरे पाटील

netizens are asking question to anil parab after making arrangements for students of kota