घाबरू नका, लवकरच भारतात उपलब्ध होईल कोरोनाची लस...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 April 2020

तब्बल ६ भारतीय कंपन्या करतायेत कोरोनावर संशोधन...

मुंबई : संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाशी झुंज देत आहे. या संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि वैज्ञानिक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कोरोनावर लस शोधण्यासाठी कित्येक वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत करत आहेत. भारतातल्या तब्बल ६ आरोग्य क्षेत्राशी संबंधित कंपन्या कोरोनावर लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतातल्या काही कंपन्या अमेरिकेच्या काही कंपन्यांसोबत मिळून कोरोनावरची लस तयार करण्याचं काम करत आहेत. गेल्या ३ दशकांपासून भारत अमेरिका हे देश मिळून काही रोगांवर लस बनवण्याचं काम करत आहेत. डेंग्यू, इन्फ्लुएंझा, टीबी यासारख्या रोगांवर या दोन देशांनी मिळून लस तयार केली आहे. त्यामुळे आता कोरोना व्हायरसवरही लस बनवण्याचं काम हे दोन देश  मिळून करत आहेत.

उद्धव ठाकरेंना द्यावा लागू शकतो राजीनामा, 172 आमदारांच्या पाठिंब्याने पुन्हा करणार सत्ता स्थापनेचा दावा?

भारतानं आतापर्यंत अनेक रोगांवर लस तयार करण्याचं काम केलं आहे. तसंच भारत जेनेरिक औषधांचं उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होतं. आतापर्यंत अनेक साथीच्या रोगांवर लस तयार कारण्याचं काम अनेक भारतीय कंपन्यांनी केलं आहे. याच कंपन्या आता कोरोनावरही लस तयार करत आहेत.

पुण्यात असलेली सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया नावाची कंपनी सध्या कोरोनावर लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. ही कंपनी जगातली सर्वात मोठी अनेक रोगांवरच्या लस पुरवणारी कंपनी आहे. हि कंपनी ५३ वर्ष जुनी आहे. या कंपनीनं आतार्यंत २० प्रकारच्या निरनिराळ्या रोगांच्या लस तयार केल्या आहेत. आता ही कंपनी कोडजेनिक्स नावाच्या एका अमेरिकेच्या बायोटेक कंपनीसोबत मिळून  व्हायरसचा सामान करू शकणारी लस बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

कोरोनामुळे जग कोमात, मात्र ज्योतिषांचा धंदा जोमात; जोतिषांना लोकं विचारतायत....

सिरम इंस्टीट्यूट ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत मिळूनही कोरोनावर लस शोधत आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून घेण्यात आलेला कोरोनाच्या लसीचा प्रयोग समाधानकारक ठरला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापर्यंत ही लस मुबलक प्रमाणात तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं इथल्या वैज्ञानिकांचं म्हणणं आहे.

दरम्यान सिरम इन्स्टिट्यूट या वर्षाच्या अखेरपर्यंत मुबलक पप्रमाणात कोरोनावरची लस तयार करू शकेल असा विश्वास सिरम इंस्टीट्यूटचे संचालक आदर पुनावाला यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे कोरोनावरची लस भारतात तयार होऊन शकते. सिरम इंस्टीट्यूटसारख्या अजून ५ कंपन्या इतर देशातील कंपन्यांसोबत मिळून कोरोनावर लस बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या संशोधनातं भारताचं मोठं योगदान असणार आहे यात काहीही शंका नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: do not worry six indian companies are doing research on corona antidote