चिंताजनक! अख्खी मुंबई कोरोनाच्या विळख्यात; आज मुंबईत रुग्णसंख्या पोहोचली 'इतक्या' हजारांवर...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

मुंबईत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. देशाच्या एकूण कोरोनाग्रस्तांपैकी सुमारे २५ टक्के कोरोनाग्रस्त हे एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईसाठी ही अतिशय चिंताजनक बाब आहे. आजची मुंबईतली आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. 

मुंबई:  मुंबईत कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. देशाच्या एकूण कोरोनाग्रस्तांपैकी सुमारे २५ टक्के कोरोनाग्रस्त हे एकट्या मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईसाठी ही अतिशय चिंताजनक बाब आहे. आजची मुंबईतली आकडेवारी अतिशय चिंताजनक आहे. 

 आज ही नव्या १५६६ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्णांचा आकडा तब्बल २८,६३४ वर पोचला आहे. तसंच आज दिवसभरात ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे  मृतांचा आकडा ९४९ वर पोहोचला आहे. आज सापडलेल्या नवीन रुग्णांपैकी २९२ रुग्ण गेल्या आठवड्याभरातले आहेत.

हेही वाचा: रेल्वेची आणखी मोठी घोषणा; पुढच्या १० दिवसात सुरु करणार ही सेवा..
                                      
मुंबईत गेल्या आठवड्याभरापासून हजारच्या वर रुग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा मोठ्या संख्येनं वाढत आहे. तसंच मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. आज सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी १२७४ रुग्ण आज पॉझिटिव्ह आले आहेत. तर २९२ रुग्ण आठवड्याभरापूर्वीचे आहेत.                  

आज झालेल्या ४० रुग्णांच्या मृत्यूंपैकी २२ जणांना दीर्घकालीन आजार असल्याची माहिती मिळतेय. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये २५ पुरुष तर १५ महिलांचा समावेश होता. मृत झालेल्या रुग्णांपैकी चौघांचं वय ४० च्या खाली आहे. तर २१ जणांचं वय ६० वर्षांच्या वर आहे. तसंच उर्वरित १५ रुग्ण ४० ते ६० वर्षांच्या दरम्यान होते. त्यामुळे मुंबईतला मृतांचा एकूण आकडा ९४९ झाला आहे.                                       

हेही वाचा: नजरेस कधी पडशील तू? लोकलची येते आम्हा आठवण..

मुंबईत संशयित रुग्णांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. आज एकूण १०५९ नवे संशयित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आतापर्यंत २४,३२३ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढत आहे. आज दिवसभरात ३९६ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आजपर्यंत तब्बल ७४७६ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. 

new 1566 corona patients found in mumbai today read full numbers 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new 1566 corona patients found in mumbai today read full numbers