esakal | नजरेस कधी पडशील तू ? लोकलची येते आम्हा आठवण
sakal

बोलून बातमी शोधा

नजरेस कधी पडशील तू ? लोकलची येते आम्हा आठवण

रोजचेच नाटक आहे यांचे, रोज काय बिघाड झालेला असतो...असे म्हणून चिडचिड करणारे आपण चक्क लोकलला मिस करतोय.

नजरेस कधी पडशील तू ? लोकलची येते आम्हा आठवण

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

ठाणे - रोजचेच नाटक आहे यांचे, रोज काय बिघाड झालेला असतो...असे म्हणून चिडचिड करणारे आपण चक्क लोकलला मिस करतोय. त्यातील गर्दी मिस करतोय. लोकलमधली ती तू तू मै मै...लोकल ग्रुपसोबतची मस्ती....सारेच मिस करत आहोत.

मुंबई आणि लोकलची गर्दी म्हटलं की इतरांच्या अंगावर काटा येतो, पण हीच गर्दी आमच्या रोजच्या जगण्याचा एक भाग आहे. सध्या हे सारेच जणू काही कुठेतरी हरवले असून साऱ्यांनाच लोकलची तीव्रतेने आठवण येऊ लागली आहे. नजरेस कधी पडशील तू ? म्हणत प्रवासी लोकल सुरु होण्याची वाट पाहतायत. 

मोठी बातमी संजय राऊत यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट, भेटून झाल्यावर म्हणालेत...

सकाळी पटापट तयारी करुन धावतपळत करत रेल्वे स्टेशन गाठायचे 8.52 ची फास्ट लोकल पकडायची आहे. स्टेशनला आल्यानंतर स्थानकातून वाकून वाकून लोकल आली का पहायचे. लोकल पंधरा मिनीटे उशीराने धावत आहे, प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. अशी सूचना कानी पडताच रोजचेच नाटक आहे यांचे, आज पण लेट ऑफिसला जायला असे नकळत आपल्या तोंडून बाहेर पडते.

लोकलचा लेटमार्क, नोकरीवर होणारा परिणाम, गर्दीत होणारी घुसमट या साऱ्याचा आपल्याला जणू कंटाळा आला तरीही आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातला तो एक भाग झाला आहे. गेले अडिच महिने लोकलसेवा बंद असल्याने हे सारेच जणू काही कुठेतरी हरवले आहे. घरात बसून कंटाळलेले नागरिक लोकल सुरु होण्याची आतुरतेने वाट पहात आहेत.

मोठी बातमी  दररोज हजार पंधराशे कोरोना रुग्ण वाढणाऱ्या मुंबईत 'मे' महिन्याच्या अखेरीस इतकी असेल रुग्णसंख्या...

कोरोनाचे संकट कधी दूर होईल माहित नाही, परंतू लोकल सुरु झाली तर आम्ही हळूहळू कामावर जाण्यास सुरुवात करु. लोकलचा प्रवास, ग्रुप, रोज भेटणारे प्रवासी या साऱ्यांची खूप आठवण येत असून लोकलशिवाय आयुष्य लाईफले झाल्यासारखे वाटत असल्याचे अनेकजण सांगतात. 

डोंबिवलीतील शितल लोके सांगतात, मैत्रिणींना तर मिस सारेच करत आहोत. परंतू मला सगळ्यात जास्त आठवण आदर्शची येत आहे. दादर येथील कर्णबधिर शाळेचा तो विद्यार्थी. आम्ही डब्यात दिसलो नाही तर तो त्याच्या आईला बोलतो आई आपली गाडी चुकली. गर्दीत तो इवलासा जीव गुदमरतो, परंतू चेहऱ्यावर कायम हसू. माणूस म्हणून समृद्ध होताना अनेकांकडून खूप काही काही शिकायला मिळते आणि ते लोकलच्या प्रवासात घडत असते. हा प्रवास पुन्हा सुरु होण्याची वाट पहात आहोत. 

मोठी बातमी - मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या...

ठाण्यातील गौरी कुंभार बोलतात, लोकलचा डब्बा म्हणजे महिलांसाठी तर घरचाच एक कोपरा असतो. शॉपिंग, भाजी साफ करणे, नाश्ता करणे, मैत्रिणींसोबत आनंद - दुःख शेअर करणे, कोणाचे तरी कधी बाळंतपणही येथे होते. आपल्या आयुष्यातील हा कोपरा खास असून लोकलचा प्रवास खुप मिस करत आहे. 

कळव्याचा तेजस वाघ म्हणतो खूप कंटाळा यायचा दोन दोन तास लोकलच्या प्रवासाचा. पण आता मात्र तो त्रास हवाहवासा वाटत आहे. कामावर जाण्याची धडपड, लोकलचा गोंधळ, पावसाळ्यात कुठे अडकलो तरी रेल्वे स्टेशनचा असलेला भक्कम आधार सारेच मिस करत आहे. पावसाळ्यात लोकल बंद व्हावी आणि घरी रहायला मिळावे असे अनेकदा मनात यायचे. पण आता बंद असलेली लोकल सुरु कधी होतेय याची वाट पहात आहे.

mumbaikars are mission their integral part of life that is local train journey in lockdown

loading image