एसटीच्या ताफ्यात लवकरच 1700 बस

एसटीच्या ताफ्यात लवकरच 1700 बस
एसटीच्या ताफ्यात लवकरच 1700 बस

मुंबई : एसटीच्या ताफ्यात नवीन १७०० बसगाड्या दाखल होणार आहेत. त्यापैकी काही गणेशोत्सव, दिवाळीदरम्यान सेवेत येतील, असे एसटी अधिकाऱ्यांनी सांगितले. 
राज्य परिवहन महामंडळाने तीन वर्षांत एकही नवीन बसची बांधणी केलेली नाही.

खिळखिळ्या झालेल्या बसगाड्यांमुळे प्रवाशांची संख्या कमी झाली असून, उत्पन्नाला फटका बसला आहे. तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाने नवीन बसगाड्यांची बांधणी हाती घेतली आहे. राज्य सरकारच्या निधीतून २०० ‘विठाई’, ५०० साध्या आणि ८०० शिवशाही (खासगी व महामंडळाच्या प्रत्येकी ४००) बसगाड्यांची बांधणी केली जात आहे. त्याचप्रमाणे रातराणी सेवेत २०० बिगर-वातानुकूलित ‘सीटर कम स्लीपर’ बसगाड्या समाविष्ट करण्याचा प्रयोग एसटी महामंडळ करणार आहे.

एसटीच्या ताफ्यात सध्या १८ हजार ५०० बसगाड्या आहेत. त्यापैकी २००० पेक्षा जास्त बसगाड्या राज्यातील अनेक आगारांमध्ये नादुरुस्त अवस्थेत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com