

Thane 350 AC E-Buses
ESakal
ठाणे : शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला पर्याय देत नागरिकांना अधिक आरामदायी आणि पर्यावरणपूरक प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे परिवहन सेवेत मोठी भर पडणार आहे. येत्या वर्षभरात तब्बल ३५० वातानुकूलित इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामध्ये २० डबल डेकर बसचा समावेश असणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.