esakal | सॅडहर्स्ट रोडजवळील नव्या जलवाहिनीमुळे रुळांवरील पाण्याचा निचरा - BMC
sakal

बोलून बातमी शोधा

BMC

सॅडहर्स्ट रोडजवळील नव्या जलवाहिनीमुळे रुळांवरील पाण्याचा निचरा - BMC

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई (mumbai) शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडल्यास सखल भागात पाणी साचते. त्यामुळे रेल्वे रूळ (railway line) पाण्यखाली जातात. मात्र, यंदा महापालिका (mumbai corporation) आणि मध्य रेल्वेच्यावतीने सॅडहर्स्ट रोड (Sandhurst Road ), मस्जिद बंदर (masjid bandar) भागातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी सॅडहर्स्ट रोड येथे मायक्रोटनलची (microtunnel) निर्मिती केली आहे. अवघ्या चार महिन्यांमध्ये सॅडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रूळाखालून मायक्रोटनलचे काम पूर्ण केले. या नव्या जलवाहिनीमुळे पाण्याचा प्रभावीपणे निचरा करण्यास मदत होत आहे. या मायक्रोटनलमुळे या भागात अतिवृष्टीच्या काळातही पावसाचे पाणी साचले नाही, अशी माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली. (New aqueduct near Sandhurst Road causes drainage of water on tracks - BMC)

मध्य रेल्वेच्या सॅडहर्स्ट रोड आणि मस्जिद बंदर दरम्यान पाणी भरण्याच्या घटना होत होत्या. ऑगस्ट 2020 रोजी मस्जिद बंदर येथे पाणी भरल्याने लोकल सेवा ठप्प झाली. त्यानंतर लोकलमधील प्रवाशांना आरपीएफ पथकाने सुरक्षितरित्या बाहेर काढले होते. या पार्श्वभूमीवर, सॅडहर्स्ट रोड आणि मस्जिद बंदर येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी 20 मार्च 2021 रोजी महापालिका आणि मध्य रेल्वेने सॅडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ मायक्रोटनलचे काम हाती घेतले. 20 जुलै 2021 रोजी या मायक्रोटनलचे काम पूर्ण झाले असून सध्या या टनलचा वापर सुरू आहे. बुधवारी (ता.21) रोजी पडलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मायक्रोटनलची मदत झाली.

हेही वाचा: जोपर्यंत 70 टक्के लसीकरण नाही, तोपर्यंत लोकल प्रवास नाही - मुंबई पालकमंत्री

पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या थांबविण्यासाठी सॅडहर्स्ट रोड येथील रेल्वे रूळाखालून 415 मी. लांबीचे आणि 1 हजार 800 मिलिमीटर व्यासाची पर्जन्य जलवाहिनी मध्य रेल्वेने टाकली. पर्जन्यजल वाहिनी महानगरपालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडण्यासाठी रेल्वे हद्दीच्या 25 मीटर लांबीची एक अतिरिक्त 'बॉक्स ड्रेन' महानगरपालिकेच्या वतीने टाकले. 'बॉक्स ड्रेन' बांधण्यात आलेल्या ठिकाणी असणाऱ्या टाटा कंपनीच्या अतिउच्च दाब क्षमतेच्या विद्युत वाहिन्या आणि मोठ्या जलवाहिन्या यामुळे हे कार्य अत्यंत आव्हानात्मक होते.

मात्र, महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी हे काम अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने व अल्पावधीत पूर्ण केले आहे. चार महिन्यांच्या कालावधीत पर्जन्य जलवाहिन्या बांधण्याचे काम पूर्ण केले. या कामासाठीचा सर्व खर्च महापालिकेने केला आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका प्रकल्प आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वे हद्दीतील पर्जन्य जलवाहिन्यांची जोडणी महापालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला करणे आवश्यक होते. त्याशिवाय पाण्याचा निचरा होणे शक्यच नव्हते.

हेही वाचा: राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झालेला नाही - राजेश टोपे

यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीत 25 मी. लांबीची 'बॉक्स ड्रेन' टाकून नवीन पर्जन्य जलवाहिनी महापालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडली. पी. डि'मेलो मार्गावर रेल्वे आयुक्त कार्यालय प्रवेशद्वारापासून मॅलेट बंदर जंक्शन पर्यंत सुमारे 25 मी. अंतरात पर्जन्य जल वाहून नेण्यासाठी प्रारंभी रेल्वे प्रशासनाकडून 1 हजार 800 मिमी व्यासाचा भूमिगत बोगदा बांधण्यात आला. पी डिमेलो मार्ग हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने वाहतूक विभागाची ना-हरकत प्राप्त करून येथील काम एप्रिल 2021 पासून काम सुरू केले होते.

हेही वाचा: राज्यात होम क्वारंटाईन व्यक्तींच्या संख्येत लक्षणीय घट

2.1 मी. बाय 2.1 मी. आकाराचे बॉक्स ड्रेन जून 2021 मध्ये बांधून पूर्ण केले. मॅलेट बंदर जंक्शन वरील 2 हजार 200 मिमी व्यासाच्या पर्जन्य जल वाहिनीला सदर पेटिका वाहिनी जोडण्यात आली. ​परिणामी, पी डिमेलो मार्गावरील पावसाळी पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासह सॅंडहर्स्ट रेल्वे स्थानकावर पावसाळी पाणी साचण्याची स्थिती नियंत्रणात येण्यास मदत होणार आहे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

loading image