बीकेसी मैदानातील दुसऱ्या कोव्हीड-19 रुग्णालयाच्या कामाला सुरुवात; अशी असेल सुविधा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

मुंबईच्या पश्चिम उपनगर असलेल्या वांद्रे- कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड-19 रुग्णालयच्या प्राथमिक कामाला आजपासून (ता.20) सुरवात करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगर असलेल्या वांद्रे- कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दुसऱ्या टप्प्यातील कोव्हीड-19 रुग्णालयच्या प्राथमिक कामाला आजपासून (ता.20) सुरवात करण्यात आली आहे. या रुग्णालयामध्ये ही 1000 बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामध्ये 100 आयसीयू आणि 900 खाटाची सुविधा असणार आहे. तर पहिल्या टप्प्यातील रुग्णालय यापूर्वीच महापालिकेला सुपूर्द करण्यात आले आहे.   

मोठा गौप्यस्फोट : असा झाला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा 'तो' शपथविधी

बीकेसीतील दुसरे रुग्णालय हे पहिल्या टप्प्यातील रुग्णालयाच्या पुढेच तयार करण्यात येत आहे. या रुग्णालयात 100 आयसीयूची व्यवस्था असलेले खाटा, तर उर्वरित 900 बेड हे ऑक्सिजन आणि नॉन-ऑक्सिजन सुविधेचे असणार आहेत. त्यामुळे या रुग्णालयात गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर देखील उपचार करण्यात येणार आहेत. 

मोठी बातमी ः अरे बापरे! पावसाळा ठरणार कोरोनासाठी पोषक? सरकारकडून समन्वय समितीची स्थापना

यापूर्वी, पहिल्या टप्प्यातील रुग्णालय हे पंधरा दिवसांपेक्षा कमी कालावधीत एमएमआरडीएकडून तयार करण्यात आले होते. सोमवारी 18 मे रोजी हे रुग्णालय एमएमआरडीएचे आयुक्त आर.ए. राजीव यांनी महानगरपालिकेकडे सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री  एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री  आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त आय.एस. चहल आणि राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यावेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new covid hospital work begins at mmrda ground at bkc