पावसाळी आजारासाठी पालिकेचा नवा निर्णय, नर्सिंग होम आणि प्रसूतीगृह नॉन कोविड 

पावसाळी आजारासाठी पालिकेचा नवा निर्णय, नर्सिंग होम आणि प्रसूतीगृह नॉन कोविड 

मुंबई:  कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून मुंबई शहरात कोरोनाचा सर्वाधिक प्रार्दुभाव झालेला पाहायला मिळाला. मात्र प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर मुंबई शहरातील कोरोना आता नियंत्रणात आला आहे. मुंबईतील रूग्णसंख्या नियंत्रणात आल्याने नर्सिंग होम तसेच प्रसूतिगृह नॉन कोविड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या रूग्णालयांतील एकूण आरक्षित खाटांवर पावसाळी आजारातील रूग्णांवर उपचार करण्याचे आदेश पालिकेनं दिले आहे. तसंच त्याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे.

मुंबईतील 72 नर्सिंग होम पालिकेच्या ताब्यात असून त्यात एकूण 4800 खाटा कोविड रूग्णांसाठी आरक्षित आहेत. मात्र आता कोरोना बाधित रूग्णांची संख्या नियंत्रणात आल्याने कोविडसाठी अतिरिक्त खाटांची आवश्यकता वाड नाही. त्यामुळे एकूण खाटांपैकी 1800 खाटा या पावसाळी आजारांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्यात. तर उर्वरित 3000 खाटांवर कोविड रूग्णांवर  उपचार होणार आहेत. मात्र या नर्सिंग होमना आता नविन कोविड रूग्ण दाखल करून घेता येणार नाही. जे रूग्ण आहेत त्यांच्यावर उपचार सुरू राहणार आहेत असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. 

कोविड रूग्णांच्या उपचारासाठी पालिकेने आपल्या रूग्णालयांसह जंबो कोविड सेंटरची सुविधा तयार केली आहे. शिवाय अनेक मोठी खासगी रूग्णालये पालिकेल्या ताब्यात आहेत. तिथे नविन रूग्णांवरील उपचार करण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी व्हेंटीलेटर,आयसीयू सारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत.

पावसाने जोर धरल्यानं पावसाळी आजारांमध्ये वाढ होऊ लागली आहेत. दोनच दिवसांपूर्वी मलेरियामुळे दोघांचा मृत्यू झाला. मलेरिया,डेंग्यूसह इतर पावसाळी आजार वाढण्याची शक्यता आहे. पावसाळी आजार वाढले तर मोठ्या रूग्णालयांमध्ये गर्दी वाढून ताण वाढू शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन पालिकेने हा निर्णय घेतल्याचे काकाणी यांनी पुढे सांगितले.

या महिन्यात शहराच्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल 41 टक्के मृत्यू हे खासगी रुग्णालयांमध्ये झाले आहेत. यापैकी बहुतेक मृत्यू नर्सिंग होममधील आहेत. अनेक नर्सिंग होममध्ये आयसीयूची सुविधा नाही. त्यामुळे रुग्ण गंभीर झाल्यानंतर त्यांना मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात येत असल्यानं अडचणी वाढत होत्या. त्यामुळे पालिकेने शहरातील नर्सिंग होम आणि प्रसूतीगृहांना कोविड  रुग्णांना दाखल करण्यास मनाई केली असल्याचे ही बोलले जात आहे.

(संपादनः पूजा विचारे)

New decision of the municipality for rain sickness, nursing home and maternity hospital non covid

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com