कोरोना रुग्णांना आता घरबसल्या घेता येणार उपचार, जाणून घ्या नवीन नियमावली...

कोरोना रुग्णांना आता घरबसल्या घेता येणार उपचार, जाणून घ्या नवीन नियमावली...
Updated on

मुंबई - कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता सरकारकडून नवनवीन प्रतिबंधात्मक योजना राबवल्या जातायत. अशात काही नवीन सूचना केंद्र सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना ज्यांना कोरोनाचे अगदी कमी किंवा ज्यांची कोरोना लक्षणं दिसायच्या आधीची स्टेज आहेत अशांसाठी नवीन नियमावली जाहीर केली गेलीये. नवीन नियमावलीप्रमाणे अशा रुग्णांना आता घरातच आयसोलेशन म्हणजे अलगीकरणात ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.  

नवीन नियमावलीप्रमाणे डॉक्टरांकडून सदर रुग्णाचं निदान केलेलं असावं. कोरोना लक्षणांपूर्वीची स्थिती, कोरोनाची अगदी कमी लक्षणं, मध्यम आणि तीव्र अशी अशा कोरोनाच्या स्टेजेस आहेत. यापैकी  कोरोना लक्षणांपूर्वीची स्थिती, कोरोनाची अगदी कमी लक्षणं असणाऱ्यां रुग्णांना आता घरात आयसोलेशनमध्ये ठेवलं जाऊ शकतं. मात्र घरातमध्ये अलगीकरणेचे नियम १०० टक्के पाळले जातील अशा सुविधा असायला हव्यात. 

काय आहे नवीन नियमावली : 

  • घरात ज्यांना अलगीकरणात राहायचं आहे अशाना घरीच अलगीकरणात ठेवण्यासाठी लागणारं 'सेल्फ आयसोलेशन' हमीपत्र भरणे बंधनकारक असेल  
  • या बाबतीतीत आवश्यक नियमावली तंतोतंत पाळणे गरजेचे आहे
  • घरातच अलगीकरण ठेवण्यात येणाऱ्या व्यक्तीची काळजी घेण्यास कुणीतरी घरात असावं. 
  • ही व्यक्ती चोवीस तास रुग्णाच्या संपर्कात असायला हवी 
  • या व्यक्तीने डॉक्टरांशी सतत कॉन्टॅक्टमध्ये राहणं देखील बंधनकारक असेल
  • घरात अलगीकरण केलेल्या रुग्णाला सर्व्हिलन्स अधिकाऱ्याकडून नियमित तपासणी करुन घेणे बंधनकारक 
  • घरातच अलगीकरण केलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीने प्रोटोकॉल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन घेणं बंधनकारक

मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. अशात मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरिक अत्यंत दाटीवाटीने राहतात. अशा ठिकाणी मात्र सेल्फ आयोसोलेशन हा पर्याय उपलब्ध नसणार आहे. 

new guidelines issed by central health department for home isolation 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com