गरिबांचा कोटा लाटणारा अटकेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 जून 2017

नवी मुंबई - महापालिकेला बनावट उत्पन्नाचे दाखले देऊन गरिबांच्या कोट्यातून हिरानंदानी रुग्णालयात सुपरस्पेशालिटी सेवा घेणाऱ्या जयदास म्हात्रे याला अखेर वाशी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी बुधवारी (ता. २८) अटक केली. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत (ता. १) कोठडी सुनावली आहे; मात्र या प्रकरणातील तलाठी फरारी असल्याने ठाणे तहसीलदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न निर्माण झाले आहे. 

कुकशेत गावात २०१५ मध्ये राजकीय वादातून दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. यात मकरंद म्हात्रेला गंभीर दुखापत झाल्याने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात केले होते; मात्र तेथे सुपर स्पेशालिटी सेवा नसल्याने त्याला हिरानंदानी रुग्णालयात हलवण्यात आले होते. या रुग्णालयाचे बिल जास्त असल्याने मकरंद याचे वडील जयदास म्हात्रे यांनी बनावट उत्पन्नाचा दाखला घेऊन मोफत उपचार घेतले होते.

तलाठी मोकाट 
जयदास म्हात्रे यांनी पुत्रप्रेमापोटी हे कृत्य केले, तरी त्यांना अटक केली आहे. मात्र म्हात्रे त्यांचे उत्पन्न जास्त असतानाही कमी उत्पन्नाचे बनावट दाखले देणारा शिरवणे तलाठी सजामधील तलाठ्यावर अद्याप तहसीलदारांनी कारवाई केलेली नाही. त्यामुळे म्हात्रे यांच्यावर कारवाई झाली, तरी या प्रकरणातील तलाठी मात्र अद्याप मोकाट आहे.

Web Title: new mumbai crime

टॅग्स