एलईडीने उजळणार नवी मुंबई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

नवी मुंबई - शहराच्या खाडीकिनाऱ्याच्या शेजारून जाणारा पाम बीच मार्ग आता एलईडी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर महापालिकेने आधी बसवलेले सोडियम व्हेपरचे दिवे काढून त्याऐवजी १४ हजार एलईडी दिवे बसवण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. एलईडी दिवे लावल्यास यातून ६० टक्के विजेची बचत होणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. 

नवी मुंबई - शहराच्या खाडीकिनाऱ्याच्या शेजारून जाणारा पाम बीच मार्ग आता एलईडी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर महापालिकेने आधी बसवलेले सोडियम व्हेपरचे दिवे काढून त्याऐवजी १४ हजार एलईडी दिवे बसवण्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. एलईडी दिवे लावल्यास यातून ६० टक्के विजेची बचत होणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे. 

पाम बीचसह ठाणे-बेलापूर आणि वाशीतील दोन मुख्य रस्त्यांवर एलईडी दिवे बसवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून शहरात लख्ख प्रकाश देणारे सोडियम व्हेपरचे दिवे कालबाह्य होणार आहेत. नवी मुंबईच्या विकासासोबतच आता विजेची वाढती मागणी लक्षात घेत विजेची बचत करण्याकडे महापालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी महापालिकेने शहरातील मुख्य रस्त्यांवर बसवण्यात आलेले सोडियम व्हेपरचे दिवे काढून टाकण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने शहरात तब्बल १४ हजार एलईडी दिवे बसवण्याचा प्रस्ताव तयार केला असून निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. बेलापूर ते वाशी अरेंजा कॉर्नरपर्यंतचा पाम बीच मार्ग, ठाणे-बेलापूरसह वाशीतून जाणाऱ्या दोन मुख्य रस्त्यांवर एलईडी दिवे बसवण्यात येणार आहेत. शहरात एलईडी लावण्याचे काम ‘बांधा, वापरा, हस्तांतरित करा’ अशा तत्त्वावर देण्यात येणार असून त्याची पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर असणार आहे. हे दिवे लावल्यानंतर सोडियम व्हेपरच्या दिव्यांच्या रोषणाईतून खर्च होणाऱ्या विजेतून ६० टक्के विजेची बचत होईल, असा दावा महापालिकेने केला आहे. या बचतीमध्ये संबंधित कंपनी व महापालिकेची भागीदारी त्या वेळी निश्‍चित केली जाणार आहे. शहरात एलईडीचे दिवे लावल्यानंतर जाहिरातीला चालना मिळेल व त्यातून चांगला उत्पन्नाचा स्रोत तयार होईल, अशी महापालिकेला अपेक्षा आहे. 

एलईडीसाठी तिसऱ्यांदा निविदा 
महापालिकेकडून एलईडी दिवे बसवण्यासाठी पहिल्यांदा काढलेल्या निविदा प्रक्रियेत ई-स्मार्ट एनर्जी सोल्युशन, श्री अॅडव्हर्टाईज, मे. सिस्का एलईडी प्रायव्हेट लिमिटेड अशा तीन कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. मात्र यात कोणीच पात्र न ठरल्याने दुसऱ्यांदा निविदा मागवली होती. यातही एकाच कंपनीची निविदा आल्याने आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

Web Title: new mumbai led lamp