महावितरणला खबरदारीच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

खारघर - खारघर सेक्‍टर १९, २० आणि २१ परिसरांतील गॅसपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये स्फोटाच्या घटना वाढल्या आहेत. महावितरणच्या वीजवाहिन्यांमध्ये शॉटसर्किट झाल्याने असे प्रकार घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन स्थायी समिती सदस्या नेत्रा पाटील यांनी केले आहे. महावितरणतर्फे घेण्यात आलेल्या ग्राहक मेळाव्यात त्या बोलत होत्या. 

खारघरच्या सेक्‍टर १९ मध्ये मंगळवारी (ता. २५) सेक्‍टर १५ ते २४ या सेक्‍टरच्या वीज ग्राहकांसाठी ग्राहक संवाद मेळावा घेण्यात आला होता. 

महानगर गॅस कंपनीतर्फे शहरातील गॅस जोडणी केलेल्या भागांमधून महावितरणच्या वीजवाहिन्याही जातात. वीजवाहिन्या निकृष्ठ झाल्याने शॉटसर्किट होण्याच्या घटना घडतात. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते, याकडे महावितरणने लक्ष द्यावे, अशी मागणी नेत्रा पाटील यांनी या वेळी केली. 

यामुळे बऱ्याच भागांत वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनाही घडत असतात. अनेक ठिकाणी पदपथांवर जिवंत वीजवाहिन्या पडून आहेत. या सर्व समस्या सोडवाव्यात, अशी मागणी करणारे निवेदन पाटील यांनी आज महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक बुधवंत यांना दिले. दुर्घटनांमुळे शहराचा वीजपुरवठा वारंवार खंडित होऊन नागरिकांचे हाल होत आहेत.

Web Title: new mumbai MSEB Kharghar