फळांच्या मागणीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

किरकोळ बाजारातील दर (प्रति किलो) 
डाळिंब 70 ते 90 रुपये 
पपई 20 ते 30 रुपये 
सीताफळ 30 ते 60 रुपये 
सफरचंद 100 ते 120 रुपये 
मोसंबी 60 ते 80 डझन 

नवी मुंबई - नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांचे उपवास सुरू असल्याने फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवस राज्यभरात विविध भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे फळांची आवक घटली आहे. नवरात्रोत्सवाच्या उपवासांमुळे फळांची वाढलेली मागणी व्यापाऱ्यांना पूर्ण करता येत नाही. 

वाशी एपीएमसीतील घाऊक बाजारात सर्वात जास्त कलिंगडाची आवक होत आहे. दररोज सुमारे साडेसात हजार क्विंटल कलिंगडे दररोज बाजारात येतात, तर दोन ते अडीच हजार क्विंटल टरबुजाची आवक होते. दोन हजार क्विंटल मोसंबी, तीनशे क्विंटल चिकू, सुमारे हजार क्विंटल पपईची आवक होते. 

सणासुदीच्या दिवसात ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी ही आवक पुरेशी आहे; मात्र यावेळी नवरात्रोत्सव सुरू होण्याच्यावेळी पाऊस आल्याने फळे मागवताच आली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने ग्राहक बाजारात फिरकलेच नाहीत. त्यामुळे शिल्लक फळे खराब झाली आणि घाऊक दरही घसरले. पावसाचा नेम नसल्याने व्यापारी फळांची मागणी करण्याचा धोका पत्करण्यास तयार नाहीत. त्यामुळे फळ बाजारात सध्या मालाचा तुटवडा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 

मागणीनुसार पुरवठा नाही 
उपवासामुळे फळांना मोठी मागणी आहे; मात्र बाजारात फळे उपलब्ध नाहीत. सणासुदीच्या काळात फळांची आवक सरासरी 400 गाड्यांवर जाते, पावसामुळे ही आवक घटली आहे. तरीही दर स्थिर आहेत. 

Web Title: new mumbai news fruit