नवी मुंबई मेट्रोला चीनी डबे?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

नवी मुंबई - सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मेट्रोच्या कोच खरेदीसाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी लवकरच चीनचा दौरा करणार आहेत. बुधवारी (ता. १९) ते चीनला रवाना होणार आहेत. त्यात ते सीआरआरसी झुझाओ कॉर्पोरेशनकडून खरेदी केल्या जाणाऱ्या मेट्रोच्या कोचची पाहणी करणार आहेत. याशिवाय मेट्रोसाठी आवश्‍यक असलेल्या इतर तांत्रिक यंत्रणांचीही पाहणी करणार आहेत. गगराणींच्या या दौऱ्यानंतर मेट्रोच्या कोच खरेदीला हिरवा कंदील मिळणार आहे. त्यामुळे चीनचा हा दौरा मेट्रो प्रकल्पासाठी महत्त्वाचा आहे. 

पाच वर्षांपूर्वी नवी मुंबईतील खारघरमध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. तीन हजार कोटींच्या या प्रकल्पाला कंत्राटदारांच्या संथगतीने केलेल्या कामाचा फटका बसला होता. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही; मात्र सिडकोच्या व्यवस्थापक संचालकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गगराणी यांनी या प्रकल्पातील कामांना पुन्हा गती दिली. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील बेलापूर-पेंधरपर्यंतची मेट्रोची स्थानके वगळता एकूण ११.१ किलोमीटर मार्गापैकी १०.५ किलोमीटरचा उन्नत मार्ग तयार झाला आहे. फक्त मेट्रो स्थानकांदरम्यानचा मार्ग शिल्लक आहे. सध्या या प्रकल्पातील ११ स्थानकांचे काम सुरू झाले आहे. यातील एक ते सहा स्थानकांची कामे सिडको फेरनिविदा मागवून करणार आहे. उर्वरित सात ते ११ मेट्रो स्थानकांची कामे आधीच्या सॅंजोश-महावीर-सुप्रीम कर्न्सोशिअमकडून करून घेण्यात येणार आहेत. मेट्रोच्या कोच खरेदीचा प्रकल्पातील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे. त्याच्या पूर्ततेसाठी १९ जुलैला गगराणी चीनला जाणार आहेत. चीनमधील सीआरआरसी झुझाओ कॉर्पोरेशनकडून खरेदी केल्या जाणाऱ्या मेट्रोच्या गाड्यांची पडताळणी करणार आहेत. यात ताशी ८० किलोमीटर वेगाने मेट्रोची चाचणी घेतली जाणार आहे. तिच्या यशस्वी चाचणीनंतर २८० कोटींच्या तीन डब्यांच्या आठ मेट्रो खरेदी केल्या जाणार आहेत. यातील दोन मेट्रो प्रथम नवी मुंबईत आणल्या जाणार आहेत. मेट्रोला आवश्‍यक सिग्नल यंत्रणा, तिकीट कलेक्‍टिंग, मेट्रोचे रूळ व वीजपुरवठा यंत्रणा याचीही पाहणी गगराणी करणार आहेत. या दौऱ्यानंतर एक हजार ३२७ कोटी ७५ लाखांच्या मेट्रो खरेदीच्या कंत्राटाचा मार्ग मोकळा होणार आहे.

दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू
मेट्रोचे पहिल्या टप्प्यातील कामाला गती मिळाल्यानंतर आता दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात झाली आहे. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आरआयटीईएस या कंपनीमार्फत हा प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. या टप्प्यात खांदेश्‍वर-तळोजा असा ८.३५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग आहे.

Web Title: new mumbai news metro