खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

कळंबोली - कळंबोलीतील मॅकडोनाल्डकडून पुरुषार्थ पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने प्रवासी त्रस्त आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडले असल्याने ही परिस्थिती उद्‌भवली असल्याची तक्रार स्थानिक करत आहेत.

सिडको प्रशासनाच्या अंतर्गत येणाऱ्या या रस्त्याची अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या हलगर्जीमुळे दुरवस्था झाली आहे, अशी तक्रार नागरिक करत आहेत. या मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत आहेत; तसेच वाहनांचे नुकसानही होत असते, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे. 

पावसाळ्यापूर्वी हा रस्ता दुरुस्त होणे अपेक्षित होते; मात्र हे काम न झाल्याने रस्ता दुरवस्थेत आहे.  सरकारतर्फे स्मार्ट सिटीची स्वप्ने दाखवली जात असून, मूलभूत सुविधांकडे सिडकोचे लक्ष नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या रस्त्यावर पथदिव्यांचीही सोय नसल्याने रात्री वाहनांना अपघात होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे सिडकोने हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

Web Title: new mumbai news rain pothole