झाडांना मिळेना जागा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

नवी मुंबई -पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईत लावण्यात येणाऱ्या ४० हजार रोपांपैकी केवळ २५ हजार रोपांची लागवड करण्यात पालिकेला यश आले आहे. रोप लागवडीसाठी पुरेशी जागा नसल्याने उर्वरित रोपे लावता आली नाहीत, अशी माहिती उद्यान विभागाने दिली. वन विभागाच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त राज्यात १ ते ७ जुलै या कालावधीत चार कोटी रोप लागवड करण्याचा संकल्प ऐरोलीतील कार्यक्रमात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. यातील ४० हजार रोपे नवी मुंबई पालिकेच्या वाट्याला आली होती. 

१ जुलैला ऐरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वनमंत्री मुनगंटीवार यांनी राज्यात चार कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला. त्यानुसार १ ते ७ जुलै या पर्यावरण सप्ताहात सरकारी यंत्रणांना रोप लागवड करणे बंधनकारक होते. त्यानुसार महापालिकेच्या वाट्याला ४० हजार रोप लागवडीचे काम आले होते; परंतु महापालिकेने या सप्ताहात केवळ २५ हजार ४४७ रोपांची लागवड केली आहे. शहरात महापालिकेच्या मालकीची जमीन नसल्याने वापराच्या प्रयोजनानुसार आरक्षित जमिनी सिडकोकडून हस्तांतरित झाल्यानंतर पालिकेला तेथे रोप लागवड करता येईल. ठाणे-बेलापूर मार्गाशेजारचा हरितपट्टा एमआयडीसीच्या अखत्यारित आहेत. त्यांच्या परवानगीनंतरच पालिकेला तेथे वृक्षारोपण करणे शक्‍य होणार आहे. यामुळे पालिका हतबल आहे.

सीबीडी, नेरूळ, जुईनगर, वाशी, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोलीसह दिघा परिसरात उद्यान विभागाच्या वतीने रोप लागवड करण्यात आली. यात रस्त्याच्या कडेला कडुलिंब, कांचन, कदंब, बावा, तामण व पॅथोडिया या झाडांचा समावेश आहे. डोंगर उतारावर फळझाडे लावली आहेत. यात जांभूळ, बकुळ, आवळा, बदाम, पेरू अशा झाडांचा समावेश आहे. शहरात हरित पट्टे तयार करण्यासाठी केंद्राकडून पालिकेला अनेक प्रकारची अनुदाने मिळतात. 

या अंतर्गत महापालिकेला अनेक नोडमध्ये फळझाडांसह इतर झाडे लावून परिसरावर सुशोभीकरणासह हरित पट्टे तयार करायचे आहेत. त्यानुसार दरवर्षी महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत शहरात रोपे लावली जातात. परंतु यावेळी जागेच्या अभावामुळे पालिकेला रोपे लावण्याचे उद्दीष्ट गाठता आले नाही.

वाशीत सर्वाधिक हरित पट्टे
उद्यान विभागामार्फत नवी मुंबईत लावण्यात आलेल्या झाडांमध्ये सर्वाधिक रोपे वाशी विभागात लावली आहेत. वाशी विभागात चार हजार १७७ रोप लागवड करून सर्वांत जास्त हरित पट्टे तयार केले आहेत. वाशी सेक्‍टर १२, १५, १६, २८, ९, १०, १० ‘ए’, व सेक्‍टर १ ते १ ‘ए’ येथे हरित पट्टे तयार केले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new mumbai tree Environment Day