Bribe Case
sakal
पनवेल : नवीन पनवेलमधील पुनर्विकास प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यासाठी सीजीएसटीच्या मालकीच्या २४ सदनिकांचा पुनर्विकासासाठी ताबा देण्याच्या मोबदल्यात एक कोटी रुपयांची लाच मागण्यात आली. याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सीजीएसटीच्या लँड अँड बिल्डिंग विभागातील अधीक्षक पंकज कुमार ऊर्फ पंकज राजपूत आणि सीजीएसटी सल्लागार प्रसाद कुमार स्वामी यांना अटक केली. खासगी रिअल इस्टेट कंपनीच्या प्रकल्पप्रमुखाने केलेल्या तक्रारीवरून सीबीआयने ही कारवाई केली.