टॅक्सीच्या टपावर तीन दिवे अनिवार्य; काय आहे दिव्यांचा अर्थ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

1 जानेवारी पासून नविन नोंदणी झालेल्या टॅक्‍सींच्या टपावर 1 फेब्रुवारी पासून हिरवा, लाल आणि पांढरा अशा तीन रंगांचे दिवे अनिवार्य राहणार आहे. त्यामूळे लाल दिवा सुरू असल्यास टॅक्‍सीत प्रवासी आहे.

मुंबई : 1 जानेवारी पासून नविन नोंदणी झालेल्या टॅक्‍सींच्या टपावर 1 फेब्रुवारी पासून हिरवा, लाल आणि पांढरा अशा तीन रंगांचे दिवे अनिवार्य राहणार आहे. त्यामूळे लाल दिवा सुरू असल्यास टॅक्‍सीत प्रवासी आहे. तर हिरवा दिवा सुरू असल्यास टॅक्‍सी रिकामी आहे. तर पांढरा दिवा सुरू असल्यास टॅक्‍सी वाहतूकीसाठी बंद असल्याचा सुचना प्रवाशांना मिळणार आहे. त्यामूळे गर्दीतही टॅक्‍सी मिळवण्यासाठी प्रवाशांना सोपे होणार असून, भाडे नाकारणाऱ्यांना चाप बसणार आहे. 

रेल्वे प्रवाशांसाठी खुश खबर, आता सुरू होणार पॉड हॉ़टेल

प्रवाशांना अनेक वेळा गर्दीच्या ठिकाणी रिकामी टॅक्‍सी मिळवण्यासाठी खटाटोप करावी लागते. प्रवासी बसुन असलेल्या टॅक्‍सीला हात दाखवल्या जाते. मात्र नाही थांबल्यास अशा टॅक्‍सी चालकांच्या विरोधात तक्रार सुद्धा केली जाते. त्यामूळे रुफ लाईटचे तिन दिवे टॅक्‍सीच्या टपावर लागल्यानंतर प्रवाशांना रिकामी टॅक्‍सी, प्रवाशांनी भरलेली टॅक्‍सी आणि वाहतूकीसाठी बंद असलेली टॅक्‍सी दुरूनच ओळखता येणार आहे. त्यामूळे निर्दोष टॅक्‍सी चालकांविरोधातील तक्रारीचे प्रमाण कमी होणार असून, मुजोर टॅक्‍सी चालकांवर कारवाई करने सोपे होणार आहे.

हेहीवाचा - वाडिया बंदमुळे मनसे आक्रमक पवित्र्यात  

काय असेल दिव्यांचा अर्थ 
हिरवा ः
टॅक्‍सीच्या टपावर हिरवा दिवा सुरू असल्यास प्रवाशांना ती प्रवासासाठी उपलब्ध असेल. 
लाल ः टॅक्‍सीतून प्रवासी प्रवास करत असल्यास संबंधित टॅक्‍सीवर लाल दिवा सुरू असेल. 
पांढरा ः सार्वजनिक प्रवासासाठी टॅक्‍सी उपलब्ध नसेल किंवा खाजगी वापरात असेल, त्यावेळी टॅक्‍सी चालकाला टपावरील पांढरा दिवा सुरू ठेवावा लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New rules apply to taxi drivers from 1 February