रेल्वे प्रवाशांसाठी खुश खबर; आता सुरू होणार "पॉड हॉटेल' 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 13 जानेवारी 2020

  • मुंबई सेंट्रलमध्ये 30 खोल्या;
  • "आयआरसीटीसी'चा उपक्रम 
     

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझमतर्फे (आयआरसीटीसी) रेल्वे प्रवाशांसाठी "पॉड हॉटेल' बांधण्यात येणार आहेत. यासाठी "आयआरसीटीसी'कडून दोन दिवसांत निविदा काढण्यात येणार आहे. या माध्यमातून सप्टेंबर 2020 पर्यंत मुंबई सेंट्रल येथे 30 खोल्या प्रवाशांसाठी खुल्या करण्यात येणार आहेत. सर्वसामान्यांना परवडणारे हे हॉटेल असून त्यात अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. 

मनसेच्या महामेळाव्यासाठी सुरक्षेची जय्यत तयारी

रेल्वे स्थानक परिसरातील खासगी हॉटेलचे दर आवाक्‍याबाहेर असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे परवडणाऱ्या दरात सुरक्षित आणि आरामदायी सुविधा देण्यासाठी पॉड हॉटेल सुरू करण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला. मुंबई सेंट्रल येथे पॉड हॉटेलसाठी निविदा काढण्यात आली असून ठेकेदार नियुक्त केल्यानंतर दोनतीन महिन्यांत पॉड हॉटेलच्या उभारणीचे कंत्राट देण्यात येईल.

एस्कॉर्टच्या नावाखाली मुंबईत शरिरविक्रीचा अड्डा

सप्टेंबर 2020 मध्ये मुंबई सेंट्रल येथे 30 खोल्यांचे पॉड हॉटेल उभारण्याचे नियोजन आहे. हॉटेल सुरू झाल्यानंतर 12 तासांसाठी प्रवाशांना या खोल्या भाड्याने देण्यात येतील, अशी माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

अशा असतील सुविधा... 
नागरिकांच्या सुरक्षेसाठी हॉटेलमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे, स्वच्छतागृह, कॉफी शॉप आदी अन्य सुविधा, संपूर्ण खोल्या वातानुकूलित असतील. कॅप्सूलच्या आकाराच्या या खोल्या असल्याने त्यांना "पॉड हॉटेल' असे संबोधण्यात आले आहे, अशी माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

16 जानेवारीला पॉड हॉटेलच्या निविदा काढण्यात येणार आहेत. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत पॉड हॉटेल प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न आहे. 
- राहुल हिमालयन, 
सरव्यवस्थापक, आयआरसीटीसी (पश्‍चिम विभाग) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pod Hotel" for Travelers from irctc