UK मधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे BMC 'वेट अँड वॉच'वर, जंबो कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय लांबण्याची शक्यता

UK मधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे BMC 'वेट अँड वॉच'वर, जंबो कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय लांबण्याची शक्यता

मुंबई, 28 : रुग्णसंख्या घटूनही जानेवारी महिन्यात जंबो कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय लांबण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई महापालिकेने वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून युके मध्ये सापडलेल्या नव्या स्ट्रेनमुळे अद्याप तरी कोणतेही जंबो कोविड केंद्र बंद न करण्याच्या निर्णय घेतला आहे. दरम्यान, येत्या आठवड्यापर्यंत थांबून रुग्णांचा आढावा घेत जंबो कोविड केंद्राबाबत निर्णय घेतला जाईल असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जंबो कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची संख्या सध्या कमी झाली आहे. असे जरी असले तरी मुंबई महानगरपालिकेने पुढील तीन महिन्यांपर्यंत कोणतेही जंबो कोरोना केअर सेंटर बंद केले जाणार नाही अशी भूमिका घेतली असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

यूके आणि मिडलइस्टमध्ये कोविड -19 च्या नवीन स्ट्रेन समोर आल्याच्या वृत्तानंतर ही भूमिका घेण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोनाशी संबंधित सर्व निर्णय वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. कारण, भविष्यात कोरोना केसेस वाढू शकतील त्यामुळे, पुढील महिन्यात जानेवारीमध्ये जंबो कोविड केअर सेंटर बंद करण्याबाबत पालिका आढावा बैठक घेणार आहेत.

भायखळा, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, नेस्को मैदान (गोरेगाव पूर्व), मुलुंड आणि दहिसर येथे सध्या पाच जंबो कोविड केअर केंद्रे आहेत. महालक्ष्मी कोविड केअर केंद्रातील सामान्य वॉर्ड बंद करण्यात आला आहे. मात्र, आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा कार्यरत आहे.

"सर्व जंबो सुविधा अजूनही कार्यरत आहेत. या छोट्या सुविधांमधील मनुष्यबळ आता मोठ्या सुविधांमध्ये आता रुपांतरीत केली जात आहे. शिवाय, लहान केंद्र कायमस्वरुपी बंद केले जात नाहीत कारण, गरज पडल्यास त्यांना पुन्हा सुरु केले जाऊ शकते", असे वरिष्ठ आरोग्य अधिका-यांनी सांगितले.

सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान, मुंबईतील सर्व 24 वॉर्डमध्ये जवळपास 450 छोट्या कोविड सुविधा बंद केल्या आहेत. पालिका रुग्णालयाचे संचालक आणि नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, ''450 पैकी सर्व कोविड सेंटर्स बंद केले नाहीत. त्यापैकी बहुतांश सुविधा आता स्टँडबाय मोडवर आहेत म्हणजेच ती बंद असूनही, गरज भासल्यास 48 तासांच्या आत त्या चालू करता येतील. कोविड केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, आता नव्या स्ट्रेनमुळे तो निर्णय पुढे ढकलला गेला आहे. मात्र, कोविड सेंटरची गरज आता फक्त 40 टक्के उरली आहे. अनेक ठिकाणचे बेड्स रिक्त आहेत. त्यामुळे, हळूहळू ते कमी केले जातील. नवा स्ट्रेन आल्यामुळे थोडे थांबून यावर निर्णय घेतला जाईल.''

आरोग्य विभाग सांभाळणारे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकणी यांनी सांगितले की, "आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात परिस्थितीचा आढावा घेणार आहोत आणि त्यानंतर कोविड केंद्राबाबत निर्णय घेऊ. एकतर ते बंद करु किंवा त्यांची संख्या कमी केली जाऊ शकते. कारण, रुग्ण कमी झाले आहेत. नव्या स्ट्रेनमुळे सध्या हा निर्णय पुढे ढकलला गेला आहे."

मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात 1,495 बेड्स आहेत, त्यातील सध्या 691 बेड्स भरलेले आहेत. त्यानंतर नेस्को गोरेगाव कोविड केंद्रात 2,040 रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. मात्र, सध्या फक्त 136 रुग्ण दाखल आहेत.

पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आजकाल बहुतेक कोविड-19 रूग्ण लक्षणे नसलेले येत आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासत नाही. ज्यांना खर्च परवडत नाही ते पालिका रुग्णालयात येतात तर मध्यमवर्गीय किंवा उच्च-मध्यम-वर्गातील रुग्ण खासगी रूग्णांकडे जातात. त्यामुळे, पालिकेच्या कोविड सेंटरवरचा ताण सध्या कमी झाला आहे.

( संपादन - सुमित बागुल )

new strain of covid 19 BMC on wait and watch mode as not to shut jumbo covid care center immediately

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com