esakal | कौतुकास्पद! मुंबईतील आदिवासी पाडे ग्रीन झोनमध्येच, उत्तम नियोजनाचा सकारात्मक परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

कौतुकास्पद! मुंबईतील आदिवासी पाडे ग्रीन झोनमध्येच, उत्तम नियोजनाचा सकारात्मक परिणाम

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई शहरातील जवळपास सर्वच भाग रेड झोनमध्ये असताना मुंबई शहरातील पारंपरिक आदिवासी पाड्यांवर मात्र, अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढणून आलेला नाही.

कौतुकास्पद! मुंबईतील आदिवासी पाडे ग्रीन झोनमध्येच, उत्तम नियोजनाचा सकारात्मक परिणाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धारावी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई शहरातील जवळपास सर्वच भाग रेड झोनमध्ये असताना मुंबई शहरातील पारंपरिक आदिवासी पाड्यांवर मात्र, अद्यापही कोरोनाचा एकही रुग्ण आढणून आलेला नाही. त्यामागे श्रमिक मुक्ती आंदोलन व कष्टकरी शेतकरी संघटनेतर्फे लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून केलेले उत्तम नियोजन हे कारण आहे.

कोरोनाचा असाही फटका; 30 वर्षानंतर प्रथमच ठाण्यातील सर्वात मोठी स्पर्धा रद्द.. 

संघटनेचे प्रमुख विठ्ठल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पाड्यावर महिला, षुरूष कार्यकर्त्यांचे गट बनवून त्यांना कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात आणून दिले गेले. फक्त शासकीय सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे समजावून सांगितले. तसेच बाहेरील व्यक्ती पाड्यावर येवू नये, म्हणून केलेले प्रयत्न आणि पाड्यावरील स्वच्छता. यामुळे आदिवासी पाडे कोरोनापासून सुरक्षीत राहिले आहेत.

मोठी बातमी - नवी मुंबईत एक आठवडा पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊन

आरे कॉलनी, नॅशनल पार्क, गोराई गाव, मढ आयलंड, मुलूंड- भांडुपचा नॅशनल पार्क भाग या परिसरातील ११० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांमध्ये अद्याप एकही कोरोना रूग्ण आढळल्याची नोंद नाही. निसर्गानुरूप स्वच्छ राहण्याची सवय असल्याने मुंबईतील आदिवासी समाज कोरोनाला त्यांच्यापासून दोन हात दूर ठेऊ शकला आहे.

कोरोनाचा असाही फटका; 30 वर्षानंतर प्रथमच ठाण्यातील सर्वात मोठी स्पर्धा रद्द.. 

संघटनांतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आदिवासींनी आपल्या संघटनांच्या मदतीने तसेच विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने जवळपास सर्वच आदिवासी पाड्यांत धान्य, मास्क, साबण व तेल यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे, जे अद्याप चालू आहे.

loading image
go to top