esakal | सौम्य कोविड रुग्णांच्या उपचारासाठी लवकरच बाजारात नवी टॅब्लेट्स
sakal

बोलून बातमी शोधा

सौम्य कोविड रुग्णांच्या उपचारासाठी लवकरच बाजारात नवी टॅब्लेट्स

सध्या कोविडच्या लसींच्या चाचण्या सुरू असतानाच सौम्य कोविड रुग्णांसाठी फॅबिफ्ल्यू टॅब्लेटस उपलब्ध होणार आहेत. फॅबिफ्ल्यू टॅब्लेटस सौम्य कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहेत.

सौम्य कोविड रुग्णांच्या उपचारासाठी लवकरच बाजारात नवी टॅब्लेट्स

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: सध्या कोविडच्या लसींच्या चाचण्या सुरू असतानाच सौम्य कोविड रुग्णांसाठी फॅबिफ्ल्यू टॅब्लेटस उपलब्ध होणार आहेत. फॅबिफ्ल्यू टॅब्लेटस सौम्य कोविड रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणार आहेत. तोंडावाटे घेतलं जाणारे हे औषध असून ग्लेन्मार्क या औषध कंपनीने या औषधाची निर्मिती केली आहे.    

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात  रुग्णावर वेळेत उपचार होणे महत्त्वाचे असते. उपाचारासाठीची औषधे तातडीने आयात करण्यावर बहुतांश देश भर देत असतानाच, आरोग्यसेवकांवरचा ताण कमी व्हावा, रुग्णांची प्रकृती लवकर सुधारून त्यांचे जीव वाचावे यासाठी ग्लेनमार्कनं प्रयत्न सुरु केले.     

कोरोनाची कमी बाधा असलेल्या रुग्णांवर देशात तिसऱ्या टप्प्याची चाचणी घेणारी ग्लेनमार्क कंपनीने घेतली आहे.  गेल्या आठवड्यात कंपनीने आपल्या फॅबिफ्ल्यू या तोंडावाटे घेण्याच्या संसर्गरोधक औषधाची 400 मिलिग्रॅम शक्तीची गोळी सौम्य कोविड बाधा असलेल्या रुग्णांवर करण्याच्या उपचारासाठी लवकरच उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली.

अधिक वाचाः पालिकेच्या रुग्णालयानंतर 'या' रुग्णालयातही लवकरच सुरु होणार पोस्ट कोविड ओपीडी

ग्लेनमार्क कंपनीतील संशोधकांच्या मते 200 मिलिग्रॅमऐवजी 400 मिलिग्रॅमची गोळी अधिक शक्तीची फॅबिफ्ल्यू तयार असल्यानं रुग्णाचे गोळ्या घेण्याचे ओझे कमी होणार आहे.सरकारी रुग्णालयांना फॅबिफ्ल्यूचा पुरवठा करण्याची ऑर्डर ग्लेनमार्कला अलीकडेच मिळाली आहे.  यामध्ये ठाणे सिव्हिल हॉस्पिटल, आणि यवतमाळ तसंच अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे.  येत्या काही दिवसात आणखीही काही रुग्णालयांना औषध पुरवण्यात येणार आहेत. 

हेही वाचाः सप्टेंबरपासून मुंबई लोकल सुरु होणार?, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

देशातील 10 सरकारी आणि खासगी रुग्णालयात त्याच्या चाचण्या सुरु झाल्या असून त्यांचे अहवाल ऑगस्टमध्ये उपलब्ध होतील. फेव्हिपीरवीर इन्फल्युएंझाच्या कोरोना विषाणूंचा प्रतिकार करत असल्याचं सिद्ध झाले असून जपानमध्ये नॉव्हेल इंफ्ल्यूएंझा विषाणूच्या प्रतिकारासाठी वापरण्यास त्याला मान्यता मिळाली आहे. देशभरात हे औषध फॅबिफ्लू या  नावाने विकले जाणार आहे.

(संपादनः पूजा विचारे)

New tablets on the market soon for the treatment of mild covid patients

loading image
go to top