esakal | पालिकेच्या रुग्णालयानंतर 'या' रुग्णालयातही लवकरच सुरु होणार पोस्ट कोविड ओपीडी
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्या रुग्णालयानंतर 'या' रुग्णालयातही लवकरच सुरु होणार पोस्ट कोविड ओपीडी

पालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयातही पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात येणार आहे. 1 सप्टेंबरपासून ही ओपीडी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सेव्हन हिल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसुळ यांनी दिली आहे. 

पालिकेच्या रुग्णालयानंतर 'या' रुग्णालयातही लवकरच सुरु होणार पोस्ट कोविड ओपीडी

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनावर मात केलेल्या रुग्णांवर दिसून येणारे तत्कालिक आणि दीर्घकालीन परिणाम दूर करण्यासाठी पालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयांमध्ये कोरोनामुक्त रूग्णांसाठी पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात आली आहे. फक्त कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांसाठी हा विशेष बाह्यरुग्ण विभाग सुरु करण्यात आला आहे. मात्र, आता उपनगरीय कोरोनामुक्त रूग्णांना ही दिलासा मिळणार आहे. कारण, पालिकेच्या सेव्हन हिल रुग्णालयातही पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात येणार आहे. 1 सप्टेंबरपासून ही ओपीडी सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सेव्हन हिल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. बाळकृष्ण अडसुळ यांनी दिली आहे. 

पालिकेच्या केईएम रुग्णालयात पहिल्यांदा पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात आली. त्यानंतर, नायर आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील नॉन कोविड ओपीडीमध्येच कोरोना मुक्त रुग्ण ज्यांना श्वास घेण्यास त्रास किंवा अशक्तपणा अशी लक्षणे जाणवू लागली त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. कोविड 19 मधून बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा अनेक गंभीर समस्या उद्भवत आहेत. अशक्तपणा, फुप्फुसाचा त्रास, श्वसनाचा त्रास, धाप लागणे, अंगदुखी असे त्रास होत आहे. त्यासाठी मुंबईत तीन ठिकाणी ओपीडी सुरु करण्यात आली आहे. 

हेही वाचाः  क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं, कोसळण्याआधी अशी दिसत होती तारीक इमारत

सेव्हन हिल रुग्णालयात 1 सप्टेंबरपासून सुरु होणार पोस्ट कोविड ओपीडी 

सध्या रुग्णालयात कोरोनामुक्त रूग्णांच्या काही तक्रारी येत आहेत का? यासाठी सर्व्हे केला जात आहे. सध्या रुग्णांना फोन वरुन संपर्क केला जात आहे. त्यामुळे, त्यांचा योग्य सर्व्हे करुनच ही पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात येईल. त्यात, त्यांचे समुपदेशन, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गेल्या 4 महिन्यांपासून एक ही रुग्ण पुन्हा तक्रारी घेऊन आलेला नाही. तक्रारी असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये पाठवले जात आहे. अनेकांना प्रवासाचा ही त्रास होईल. त्यामुळे, सर्व परिस्थिती बघून 1 सप्टेंबरपासून ही ओपीडी सुरु केली जाईल. शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही डॉ. अडसुळ यांनी सांगितले आहे. 

अधिक वाचाः  महाड इमारत दुर्घटनाः अमित शहांकडून दखल; दुर्घटनेवर अन्य नेत्यांनी काय दिली प्रतिक्रिया, जाणून घ्या

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कोरोना सेंटर्स तसेच पूर्णपणे कोरोनासाठी असलेली रुग्णालये उभी केली आहेत. प्रतिबंधक उपाययोजना आणि सर्वोत्तम औषधोपचार यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्के इतके प्रचंड आहे. मात्र, कोरोनामुक्तीनंतर काही रुग्णांमध्ये अनेक शारीरिक समस्या पाहायला मिळाला. त्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यांदा केईएममध्ये पोस्ट कोविड सुरु करण्यात आली आहे. त्यानंतर आता इतर रुग्णालयांतील नॉन कोविड ओपीडी मध्ये कोरोनामुक्त आणि इतर रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तसंच, सध्या कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना पल्मनरी फायब्रोसिसचा धोका होऊ लागला आहे. असे रुग्ण ही दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, अश्या रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग सुरू केले जात आहेत. 

या रुग्णांवर होणार उपचार 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना काही दिवसांनंतर पुन्हा एकदा अशक्तपणा, फुप्फुसाचा त्रास, श्वसनाचा त्रास उद्भवत आहेत. या रुग्णांवर ओपिडीत उपचार केले जाणार आहेत.

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना उद्भवणार्या आजारांवर सध्या नॉन कोविड ओपीडीत उपचार केले जात आहेत. पुढच्या आठवड्यापासून पोस्ट कोविड ओपीडी सुरु केली जाईल, नायर रुग्णालय अधिष्ठाता आणि पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. तर, शीव रुग्णालयातही नॉन कोविड ओपीडीतच कोरोनामुक्त रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले आहे.

(संपादनः पूजा विचारे)

Post covid OPD will start from September 1 Seven Hill Hospital

loading image
go to top