१ सप्टेंबरपासून मुंबई लोकल सुरु होणार?, मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' उत्तर

१ सप्टेंबरपासून मुंबई लोकल सुरु होणार?, मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' उत्तर

मुंबईः एक सप्टेंबरपासून राज्यात लॉकडाउन पूर्णपणे उठणार नसल्याचं संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका बैठकीदरम्यान दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईची लाईफलाईन लोकल रेल्वे आणि ई पास याबाबत सूचक विधान केलं आहे.  ठाण्यात कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ठाकरे सोमवारी आले होते. यावेळी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीमधील कोरोना नियंत्रण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सोमवारी या तिन्ही पालिकांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठाणे पालिका मुख्यालयात बैठक घेतली. 

जूनपासून मिशन बिगेन सुरु करण्यात आलं असलं तरी महाराष्ट्रात अनलॉक  करण्याची घाई करणार नसल्याचं स्पष्ट मत यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे मुंबई लोकल सुरू होण्यासाठी आणि ई पासची प्रक्रिया बंद होण्यासाठी आणखीन काही काळ वाट बघावी लागणार हे स्पष्ट झालं आहे. 

मुंबई महानगर क्षेत्रातील शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे.  आधी वेळी सुरु करायचे आणि नंतर बंद करण्याची वेळ येऊ नये, त्यामुळे खात्री झाल्याशिवाय अनलॉकचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. कोरोना नियंत्रणात  येतोय ही चांगली बाब असली तरी कौतुकाचे बळी पडू नका, कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, हा जगाचा अनुभव असल्याने गाफीलही राहू नका असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

जगभरात काही देशांनी काही गोष्टी घाईगडबडीने सुरु केल्या. पण महाराष्ट्रत तशी गडबड केली जाणार आहे. कारण आपण ज्या गोष्टी सरु केल्या आहेत. त्या पुन्हा बंद होणार नाहीत याी दक्षता घेऊन सुरु केल्या आहेत. पण ज्या गोष्टी सध्या उघडणे शक्य नाही, किंवा त्या उघडल्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव किती वाढेल. याची खात्री नाही त्या सुरु केल्या नाहीत, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

 ठाणे पालिका मुख्यालयात झालेल्या  बैठकीस नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्री महोदयांचे सल्लागार अजोय मेहता, आरोग्य प्रधान सचिव, डॉ. प्रदिप व्यास, खा. श्रीकांत शिंदे, आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक यांसह सर्व मनपा आयुक्त, पोलिस अधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत आहे. त्यामुळे बाकी नोकरदारवर्ग आणि प्रवाशांना लोकलमध्ये कधी प्रवेश मिळणार याची प्रतिक्षा कायम आहे.

Cm Udhhav Thackeray given reaction on after 1 september lockdown and local train

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com