

Mumbai Traffic Update
esakal
Mumbai Police: मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी १ फेब्रुवारीपासून शहरात नवीन वाहतूक नियम लागू केला आहे. नवीन नियमांनुसार शहरामध्ये जड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेमध्ये शहरात जड वाहनांना प्रवेश नसेल.