आतली खबर : प्रत्येक मंत्र्याला चार खाती, संध्याकाळी निघणार नोटिफिकेशन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 December 2019

कुणाला कोणतं खातं मिळतंय याची उत्सुकता.. 

सत्ता स्थापन होऊन अनेक दिवस उलटलेत, अद्याप महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आलेला नाही. मंत्रिमंडळ विस्तारासोबत कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं ? हे देखील अजूनही स्पष्ट झालेलं नाही. अशात येत्या १६ तारखेपासून महाराष्ट्र राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे.  विरोधकांकडून अधिवेशनात कुणाला प्रश्न विचारायचे हा मुद्दा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारलेला पाहायला मिळाला. अधिवेशनाच्या आधी आता कुणाकडे कोणतं खातं ? याची यादी मुख्यमंत्री कार्यालयातून राजभवनाकडे सुपूर्त करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न , ही तर दडपशाही.. - संजय राऊत  
      
येत्या १६ तारखेला हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. दरम्यान, नागपूर अधिवेशनासाठी तूर्तास सहा मंत्र्यांमध्ये खाते वाटप होणार असल्याची माहिती समोर येतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सहा मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दोन मंत्र्यांचा समावेश आहे.

आता प्रत्येक मंत्र्यांकडे चार खाती जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर उर्वरित भार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहे. या संदर्भातील यादी मुख्यमंत्री कार्यालयातून राजभवनाकडे सुपूर्त करण्यात आली आहे. आज, या खातेवाटपाच्या यादीवर राज्यपालांची सही होऊन आज संध्याकाळपर्यंत नोटिफिकेशन निघणार असल्याची देखील माहिती समोर येतेय. 

महत्त्वाची बातमी :   माझी लढण्याची प्रेरणा माझी आई आणि सर्वसामान्य माणूस : पवार

नागपूर अधिवेशनापूर्वी खाते वाटप नाही, उत्तरं कोण देणार असा सवाल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता. दरम्यान आजच्या या खातेवाटपाच्या अपडेट नंतर आता कुणाला कोणतं खातं मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे  

WebTitle : cm office sends list to governor about cabinet roles and responsibilities : 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm office sends list to governor about cabinet roles and responsibilities