'थकीत कर्ज कमी करा, देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक' - शक्तिकांता दास

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 December 2019

RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतातील अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त केलीये, येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असं शक्तिकांता दास यांनी म्हटलंय.

सध्या दररोज 'ही' बँक डबघाईला, अमुक माणसाने बँकेला लुटलं, आजपासून तुमच्या खात्यातून एवढेच पैसे काढा, अशा बातम्या येतायत. PMC बँकेचं प्रकरण  तर एकदम ताजं आहे. अशातच तुमच्या आमच्या मनात धडकी भरवणारी बातमी समोर येतेय. बातमी आहे RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीची 

RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी भारतातील अर्थव्यवस्थेवर चिंता व्यक्त केलीये, येत्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो, असं शक्तिकांता दास यांनी म्हटलंय. 

शक्तिकांता दास यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या प्रमुखांशी, बँकांच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा केली. यामध्ये, येणाऱ्या काळात देशातील बँकांसमोर समोर उद्भवणाऱ्या परिस्थितीबाबत तयार राहण्याचा सल्ला त्यांनी दिलाय. येणाऱ्या काळात  बँकांसमोरील परिस्थितीतबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. स्वतः RBI चे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी दिलेला या संकेतांमुळे बँकिंग क्षेत्रावरील मंदीचे ढग आणखी गडद होणार हे स्पष्ट आहे. 

महत्त्वाची बातमी : आतली खबर : प्रत्येक मंत्र्याला चार खाती, संध्याकाळी निघणार नोटिफिकेशन

RBI ने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलंय. यामध्ये देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचं सांगण्यात आलंय.  बँकांना तातडीने थकीत कर्ज कमी करण्याचा सल्ला यामध्ये देण्यात आलाय. सध्या देशातील बँकिंग व्यवस्था मजबूत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  सरकारकडून याबाबत अनेक उपाययोजना देखील राबवण्यात येत आहेत, असं देखील यामध्ये नमूद करण्यात आलंय. दरम्यान येत्या काळात महागाईचा आकडा वाढलेला पाहायला मिळणार आहे, असं देखील शक्तिकांता दास यांनी या पत्रकात म्हटलंय.   

हेही वाचा : दीपिका, कतरिना नाही तर 'ही' आहे आशियातली सर्वात सेक्सी महिला

गेल्या काळात पाचदा रेपो दरात कपात केली आहे. मागील पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवण्यात आले. मात्र बँकांनी त्याचा फायदा ग्राहकांना दिलेला दिसून आलेला नाही. बँकांकडून याबाबत टाळाटाळ देखील करण्यात येतेय.  दरम्यान हा फायदा ग्राहकांना मिळावा यासाठी दास यांनी बँकांच्या प्रमुखांशी चर्चा केली. 

Webtitle : RBI governor on spoke to the banking officials regarding future management

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI governor on spoke to the banking officials regarding future management