esakal | पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताय? बाजारात मखरांचा नवा 'ट्रेंड' आलाय
sakal

बोलून बातमी शोधा

ganeshotsav

बांबूच्या काठ्या पासून ते कागदापासून बनवण्यात आलेले मखर खरेदी करण्याकडे गणेशभक्तांच्या कल दिसतो आहे. प्लास्टिक बंदीमुळे यंदाही पर्यावरण पूरक मखर तयार करण्यावर भर देण्यात आला आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताय? बाजारात मखरांचा नवा 'ट्रेंड' आलाय

sakal_logo
By
निलेश मोरे

घाटकोपर : गणेशोत्सव जवळ आल्याने बाजारात उत्सवाच्या खरेदीची तयारी सुरू झाली आहे. गेल्या वर्षी शासनाने प्लास्टिक बंदी केल्यानंतर पर्यावरण पूरक मखराची मागणी वाढली आहे. बांबूच्या काठ्यापासून ते कागदापासून बनवण्यात आलेले मखर खरेदी करण्याकडे गणेशभक्तांच्या कल दिसतो आहे. प्लास्टिक बंदीमुळे यंदाही पर्यावरण पूरक मखर तयार करण्यावर भर देण्यात आला आहे. मुंबई उपनगरातील घाटकोपर मध्ये वारली चटई पासून बनवण्यात आलेल्या मखरांना गणेशभक्तांकडून अधिक पसंती मिळते आहे.

नक्की वाचा : गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्यांची चौकशी करताय? वाचा ही महत्त्वाची बातमी...

वारली चटई अर्थातच आदिवासी जमातींनी हाताने विणलेल्या मखरांना वारली चटई असे नाव देण्यात आले आहे. वारली या आदिवासी जमातीमध्ये कलेची वेगळीच नैपुण्यता पाहायला मिळते. बांबूच्या काठी पासून बनवण्यात आलेले हे मखर फोल्डिंग देखील करता येत असल्याने वर्षानुवर्षे ते वापरता येतात. घाटकोपर पश्चिम येथील शिवमुद्रा कला केंद्रामध्ये हे मखर विक्रीसाठी आले असून गणेशभक्तांनी त्याची बुकिंग देखील सुरू केली आहे. साधारण दीड फुटांपासून ते चार फुटापर्यंत हे मखर विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. हजार रुपयांपासून ते साडेचार हजार पर्यंत या मखरांची किंमत ठेवण्यात आली आहे.

हे ही वाचा : गणेश भक्तांना दिलासा; बाप्पाची मूर्ती थेट येणार दारी 

गेल्या वर्षी प्लास्टिक बंदी झाली तेव्हापासून पर्यावरण पूरक मखरांची पसंती वाढली आहे. यंदा लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरी गणेशभक्तांचा खरेदीतून उत्साह कायम दिसतो आहे. 

- वैभव नारकर, विक्रेते, शिवमुद्रा कला केंद्र

(संपादन : वैभव गाटे)

new trend in market for ganpati decoration

loading image