सावधान! कोणत्या देशातून नाहीतर 'येथून' नवा व्हायरस येण्याची शक्यता

सावधान! कोणत्या देशातून नाहीतर 'येथून' नवा व्हायरस येण्याची शक्यता

मुंबई- सध्या कोरोना व्हायरसनं जगभरात धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसमुळे जगभरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जगभरातल्या अनेक देशांमध्ये याचा प्रार्दुभाव झालेला पाहायला मिळतोय. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी अनेक देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. दरम्यान एका व्हायरसमधून सावरत नाही तोपर्यंत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. परग्रहांवरुन पृथ्वीवर व्हायरस येण्याची शक्यता असल्याची माहिती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. पृथ्वीवरील सध्याचा कोरोना व्हायरसचा धोका पाहता परग्रहांवरही असे व्हायरस असावेत आणि तिथल्या नमुन्यांमार्फत पृथ्वीवर हे व्हायरस येऊ शकतात, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसनं आता वैज्ञानिकांना प्रत्येक नवीन शोधावर विचार करण्यास भाग पाडलं आहे. अशा परिस्थितीत, इतर ग्रहांवर जीवनाचा शोध घेणारे वैज्ञानिकही आता संशोधनापूर्वी सर्व प्रकारच्या तपासणीत गुंतले असलेले दिसताहेत. नासाच्या वैज्ञानिकांनी इशारा दिला आहे की, इतर ग्रहांपासून आणलेल्या मातीच्या नमुन्यांवरुन असं समजतं की पृथ्वीवर नव्या व्हायरसचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. मंगळातून पृथ्वीवर आणण्यात आलेल्या नमुन्यांविषयीही शास्त्रज्ञांनी सावध होण्याचा इशारा दिला आहे.

सध्या आपण एका अदृश्य महामारीशी लढत आहोत आणि भविष्यातही अशा समस्यांशी आपल्याला सामना करावा लागण्याची शक्यता आहे. परग्रहांवरूनही व्हायरस येऊ शकतात. मंगळ ग्रहावर असणारी दगडं लाखो वर्षे जुनी आहेत. माझ्या माहितीनुसार तिथं सक्रिय जीव असू शकतात, जे पृथ्वीवर आल्यानंतर व्हायरसच्या रुपात पसरू शकतात, असं स्टँडफोर्ड युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक स्कॉट हबार्ड यांनी सांगितलं आहे. 

पुढे हबार्ड म्हणाले की, आपल्याला प्लनेटरी प्रोटेक्शन घेण्याची गरज आहे. मंगळ ग्रहांवरून पृथ्वीवर आणले जाणारे आणण्यात येणारे मातीचे नमुने म्हणजे एखाद्या धोकादायक व्हायरसला आमंत्रण दिल्यासारखं आहे. त्यामुळे ते सुरक्षित असल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्या व्हायरसप्रमाणेच त्यांच्यावर काम व्हावं. शिवाय  अंतराळ मोहिमेत वापरण्यात येणारे रॉकेट्स आणि इतर उपकरणंही डिसइन्फेक्ट करावीत.

अंतराळवीरांना देखील क्वारंटाइन करणं आवश्यक

त्यांनी सांगितलं की, अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांनाही क्वारंटाइन केलं जावं, जसं पहिल्या चंद्र मोहिमेवर पाठवण्यात आलेल्या अपोला यांना करण्यात आलं होतं. पुढे स्कॉट हबार्ड यांनी म्हटलं की, मिशनवरील रॉकेट्स आणि सर्व उपकरणे रासायनिक स्वच्छता प्रक्रियेमध्ये ठेवली पाहिजेत. महत्त्वाचे म्हणजे नासाने 2024 पर्यंत चंद्राकडे आणि 2030 पर्यंत मंगळासाठी मिशन तयार केले आहे.

new virus might come from space read full news report here

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com