नववर्षाची सुरवात 'मेगाब्लॉक'ने

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 2017 चा पहिलाच दिवस रविवार असल्याने रेल्वे प्रशासनाला त्याच दिवशी मेगाब्लॉकशिवाय पर्याय राहिलेला नाही.

मध्य रेल्वे

मुंबई : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मध्य आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 2017 चा पहिलाच दिवस रविवार असल्याने रेल्वे प्रशासनाला त्याच दिवशी मेगाब्लॉकशिवाय पर्याय राहिलेला नाही.

मध्य रेल्वे
ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 पर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे सकाळी 10.48 ते दुपारी 4.23 पर्यंत मुलुंड ते कल्याणपर्यंत लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल 10 मिनिटे उशिराने अपेक्षित आहेत. धीम्या मार्गावर कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली स्थानकावर एकही लोकल नसेल. सकाळी 10.20 ते दुपारी 2.42 पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद लोकलला विक्रोळी, भांडुप, मुलुंड व दिवा स्थानकात थांबा देण्यात आला आहे. ठाण्याहून सकाळी 11 ते दुपारी 3.08 पर्यंत सुटणाऱ्या जलद लोकल मुलुंड, भांडुप, विक्रोळी स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्ग
सीएसएमटी ते चुनाभट्टी/माहीम स्थानकादरम्यान सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत दुरुस्तीची कामे केली जातील. सकाळी 11.21 ते दुपारी 4.39 पर्यंत सीएसएमटी ते पनवेल आणि सकाळी 10.38 ते सायंकाळी 4.43 पर्यंत सीएसएमटी ते वांद्रे/अंधेरीकरता सुटणाऱ्या लोकल रद्द केल्या जातील. सकाळी 9.52 ते दुपारी 3.26 पर्यंत पनवेल ते सीएसएमटी आणि सकाळी 10.44 ते सायंकाळी 4.13 पर्यंत अंधेरी ते सीएसएमटीपर्यंतची लोकल सेवा बंद राहील. पनवेल ते कुर्ला या मार्गावर विशेष लोकल चालवली जाईल.

पश्‍चिम रेल्वे
बोरीवली ते गोरेगाव दरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरीवली ते गोरेगाव दरम्यानच्या धीम्या लोकल जलद मार्गावर चालवण्यात येणार आहेत. तसेच, बोरीवली स्थानकामधील फलाट क्रमांक आठ व नऊवर लोकल थांबणार नाहीत, तर काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

Web Title: new year to start with megablock