

Newborn Baby Falls on Floor in virar hospital
ESakal
मुंबई : विरार येथील एका रुग्णालयात महिलेच्या प्रसूतीदरम्यान बाळ थेट अडीच ते तीन फुटांवरुन जमिनीवर कोसळल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ पसरली असून बाळाचं प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे हा धक्कादायक प्रकार घडला आहे, असा आरोप महिलेने केला आहे.