

Newborn baby dies
ESakal
उल्हासनगर : कमी वजनाच्या नवजात चिमुकलीला जीवनासाठी आवश्यक असलेली नवजात शिशू अतिदक्षता विभाग आणि व्हेंटिलेटर सुविधा वेळेत न मिळाल्याने या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ३१) रात्री उघडकीस आली आहे. या घटनेनंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या मर्यादा पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. दुसरीकडे रुग्णालयात 'एनआयसीयू' सुरू करण्यासाठी आम्ही वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा व पत्रव्यवहार करीत असल्याची माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली.