चहल ऍक्शनमध्ये पण कोरोनाला रोखण्याचे नवे आयुक्त चहल यांच्यापुढे मोठे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मे 2020

इकबाल सिंग चहल यांनी आज मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली. मुंबईत वेगाने फ़ैलावत चाललेल्या कोरोनावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान नव्या पालिका आयुक्तांपुढे आहे

मुंबई, ता. 9 - इकबाल सिंग चहल यांनी आज मुंबई महानगरपालिका आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारली. मुंबईत वेगाने फ़ैलावत चाललेल्या कोरोनावर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान नव्या पालिका आयुक्तांपुढे आहे. राज्यातील मंत्रिमंडळ, केंद्र सरकार यांच्याशी समन्वय ठेवून पालिकेतील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन कोरोनाबाबतचा रिझल्ट त्यांना द्यावा लागणार आहे. 

मुंबईतील कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्यामुळेच पालिकेचे माजी आयुक्त प्रवीण परदेशी यांना आयुक्तपद सोडावे लागले. आता मुंबईत कोरोनाचा पसरत असताना, कोरोना बाधितांचा आणि मृतांचा आकडा दररोज वाढत असताना कोरोनाच्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी चहल यांची आयुक्तपदी राज्य सरकारने नियुक्ती केली आहे.

सर्वात मोठी खुशखबर ! गावी जाणाऱ्यांसाठी सोमवारपासून लालपरीची मोफत सेवा - अनिल परब 

अजूनही यश आलेले नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही, पालिका प्रशासन आणि आरोग्य खाते यांच्यात ताळमेळ नाही. अनेक परिपत्रके काढल्याने निर्माण झालेला गोंधळ, अशा अनेक गोष्टी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या बदलीमागे असल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात सुरू आहे. नगरविकास विभागाचे प्रधान सचिव इक्बाल चहल यांच्याकडे मुंबई महापालिका आयुक्त पदाचा कार्यभार सरकारने तडकाफडकी सोपविला हा काळ चर्चेचा विषय ठरला होता. 

नोकरी गेली तरी घाबरू नका ! सरकारची 'ही' योजना देते दोन वर्षांचा पगार...

झोपडपट्ट्यामध्ये झपाट्याने कोरोनाचा पसरू लागलाय. कोरोनाचे प्रतिबंधित विभाग वाढत आहेत. कोरोनावर नियंत्रण येत नव्हते,  मंत्रीमंडळाशी समन्वय नाही,  पालिकेचे प्रशासन आणि आरोग्य विभाग यांच्यात कोणताही समन्वय नाही, अधिकाऱयांना पालिका आयुक्त व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये ताटकळत ठेवत असल्याबद्दल अधिकाऱयांची नाराजी, आरोग्य अधिकाऱयांना कोणतेही अधिकार न देणे,  सहाय्यक आयुक्तांकडे अधिकार देणे, त्यामुळे परदेशी यांच्याविषयी नाराजी वाढल्याचे दिसून येत होते. नवे आयुक्त चहल यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.

चहल यांनी यांनी आज पालिका आयुक्‍त म्‍हणून पदभार स्वीकारला. 

newly appointed iqbal chahal have biggest target to reduce covid count of mumbai

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: newly appointed iqbal chahal have biggest target to reduce covid count of mumbai