बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या उपाध्यक्षपदी डॉ. दाभाडकर

डॉ. चंद्रशेखर दाभाडकर
डॉ. चंद्रशेखर दाभाडकर

महाड (बातमीदार) : महाड येथील बालरोगतज्ज्ञ व जनमानसात लोकप्रिय असणारे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांची भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी विक्रमी मताधिक्‍याने निवड झाली आहे. 

डॉ. दाभाडकर हे गेली ३० वर्षे महाड येथे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. २५ वर्षे या संघटनेत त्यांनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध पदांवर काम केले आहे. २०१३ मध्ये राष्ट्रीय कार्यकारणीवर त्यांची विक्रमी मतांनी निवड झाली होती. या निवडणुकीत गेले काही दिवस संघटनेच्या संपूर्ण भारतातील सदस्यांनी इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने मतदान केले. 
सोमवारी झालेल्या निकालात डॉ. दाभाडकर विक्रमी मतदानाने विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले. यापूर्वी डॉ. दाभाडकर यांना त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्यासाठी स्थानिक व राज्य, राष्ट्रीय अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. 

कै. अण्णासाहेब सावंत जीवनगौरव पुरस्कार, रायगड भूषण पुरस्कार, धन्वंतरी पुरस्कार, निर्भीड सेवा पुरस्कार, डॉ. नाडकर्णी पुरस्कार हे महत्त्वाचे पुरस्कार आहेत. राष्ट्रीय बालरोग संघटनेने इंदोर येथे त्यांना फेलो ऑफ इंडियन अकॅडमी ऑफ पेडिस्ट्रिक्‍स’ ही उपाधी देऊन गौरव केला आहे. 

डॉ. दाभाडकर यांचे त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील सर्व मंडळींनी अभिनंदन केले आहे. आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, नगराध्यक्ष स्नेहल जगताप, भाजपचे बिपीन म्हामुनकर व राजेय भोसले यांनीही दाभाडकरांचे अभिनंदन केले. 
डॉ. दाभाडकर यांनी या विजयाचे श्रेय त्यांना या निवडणूक कार्यात मदत करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील व राज्यातील सर्व मित्रांना व डॉ. सुजाता दाभाडकर यांना दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com