esakal | सावधान ! डोळ्यांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग? चिंताजनक अहवाल
sakal

बोलून बातमी शोधा

eyes

जगभरात कोरोनाने हाहाकार उडवला असून कोरोना पसरण्याबाबत आता एक नवा अभ्यास समोर आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग हा फक्त श्वसनाद्वारे नव्हे तर तोंड आणि डोळ्यांमधूनही होतो असा दावा हाँगकाँगमधील शास्त्रज्ञांनी केला आहे.

सावधान ! डोळ्यांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा संसर्ग? चिंताजनक अहवाल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : जगभरात कोरोनाने हाहाकार उडवला असून कोरोना पसरण्याबाबत आता एक नवा अभ्यास समोर आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग हा फक्त श्वसनाद्वारे नव्हे तर तोंड आणि डोळ्यांमधूनही होतो असा दावा हाँगकाँगमधील शास्त्रज्ञांनी केला आहे. या आधी आलेल्या सार्स आणि बर्ड फ्लू पेक्षा ही कोरोना संसर्गाचा वेग शंभर पट असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे. कोरोनाचा संसर्ग नाका तोंडावाटे होतो म्हणून आपण मास्क, रुमालाचा वापर करत आहोत पण, आता डोळयावाटे पसरणार्या संसर्गाला कसे रोखता येणार या विषयी देखील चर्चा आणि अभ्यास सुरु करण्यात आला आहे.

नक्की वाचा : लॉकडाऊनमुळे नोकरी मिळत नाहीये?..घाबरू नका.. अशी मिळवा नोकरी

काय सांगतो अहवाल ? 

'द लान्स रेस्पीरेट्री मेडिसीन' या जर्नलमध्ये याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले आहे. कोरोनाचा कोव्हिड - 19 हा सार्स विषाणूच्या परिवारातीलच दुसरा आणि अधिक तीव्र असा विषाणू आहे. त्यामूळे त्याची संसर्गाची भीती आणि क्षमता ही कित्येक पट असल्याचे हाँगकाँग विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. मायकल चॅन ची - वाई आणि टिमने केलेलया संशोधनात आढळले आहे. 

मोठी बातमी धक्कादायक ! कोरोनामुळे सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू

डोळ्यांना स्पर्श करणे टाळा- 

डोळ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून वारंवार डोळ्यांना हात लावणे टाळा. वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ धुणे अशी काळजी घ्या असा सल्ला डॉ. मायकल चॅन यांनी दिला आहे. हातांचा डोळयांना स्पर्श होऊ नये म्हणुन डोळ्यांवर गॉगल चा वापर करावा असे ही मत तद्य व्यक्त करतात. 

महत्वाची बातमी : मुंबई विद्यापीठाकडून 158 परीक्षांचे नियोजन सुरू, वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

डोळ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा व्हायरस अधिक -

त्यामुळे, नेत्रतज्ज्ञांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. नेत्रतज्ज्ञांनी डोळ्यांच्या समस्येने रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांविषयी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जागतिक नेत्रतज्ज्ञांनी केले आहे. रुग्णाच्या डोळ्यांची तपासणी करताना काळजी घ्यावी लागते. डोळ्याच्या पृष्ठभागात विषाणू राहतो त्यानंतर तो पसरतो.  डोळ्यांच्या माध्यमातून कोरोनाचा व्हायरस शरीरामध्ये प्रवेश करण्याची शक्यता अधिक असल्याचेही संशोधकांनी म्हटलं आहे.

Take care of your eyes, corona infection can also occur through the eyes

loading image
go to top