राज्यासाठी 'पॉझिटिव्ह' बातमी! दिवसभरात 5 हजारहून अधिक रुग्ण 'कोरोनामुक्त'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 June 2020

यापूर्वी 29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8381 कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जाण्याची ती पहिलीच वेळ होती. त्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख सतत वाढत आहे.

मुंबई : राज्यात 15 दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येने कोरोनामुक्त रुग्णांना घरी पाठवण्यात आले. राज्यभरातील बऱ्या झालेल्या 5071 रुग्णांना सोमवारी रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला. मुंबई मंडळात एकाच दिवशी सर्वाधिक 4242 कोरोनामुक्त व्यक्ती घरी परत गेल्या. राज्यात आतापर्यंत 56 हजार 49 रुग्ण बरे झाले आहेत.

महत्वाची बातमी : मुंबई विमानतळावरुन विमान उड्डाणांची संख्या वाढणार, 'या' तारखेपासून होणार सुरुवात

यापूर्वी 29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8381 कोरोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी जाण्याची ती पहिलीच वेळ होती. त्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख सतत वाढत आहे. सुमारे 15 दिवसांनंतर सोमवारी पुन्हा एकदा बऱ्या झालेल्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक नोंदवला. कोरोनावर मात केलेल्या 5071 रुग्णांना सोमवारी घरी पाठवण्यात आले. त्यांच्यात मुंबई मंडळातील 4242 (आतापर्यंत 39 हजार 976), पुणे मंडळातील 568 (आतापर्यंत 8430), नाशिक मंडळातील 100 (आतापर्यंत 2365), औरंगाबाद मंडळातील 75 (आतापर्यंत 1945), कोल्हापूर मंडळातील 24 (आतापर्यंत 1030), लातूर मंडळातील 11 (आतापर्यंत 444), अकोला मंडळातील 22 (आतापर्यंत 1048) आणि नागपूर मंडळातील 29 (आतापर्यंत 811) व्यक्तींचा समावेश होता.

नक्की वाचा : एका कोरोनाबाधित डॉक्टरामुळे अख्खं गाव हदरलं!, 300 हून अधिक रुग्ण संपर्कात

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याच्या तीन महिन्यांनंतर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 47.2 टक्के आहे. कोव्हिड उपचारांसाठी त्रिसूत्री कार्यक्रम आखण्यात आला असून, प्रत्येक रुग्णाची काळजी घेण्यात येत आहे. दीर्घकालीन आजारी व गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी खास पथके नेमण्यात आली आहेत. 
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री

news for the state! More than 5,000 patients corona free in a day


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news for the state! More than 5,000 patients corona free in a day