
उरण : जेएनपीटीतून चीनी बनावटीच्या ड्रोनची तस्करी; १२०० ड्रोनचा साठा जप्त
उरण : जेएनपीटी बंदरातून (JNPT Port) चीनमधून आयात करण्यात आलेल्या १२०० ड्रोनचा साठा जप्त (Drone stock seized) करण्यात आला आहे. या मालाची किंमत सुमारे पावणेपाच कोटी रुपये असून न्हावा-शेवा सीमा शुल्क विभागाच्या क्राईम इंटेलिजेन्स युनिटच्या (crime intellectual unit) अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. गेल्या महिन्यापासून विदेशातून ड्रोन आयात करण्यास केंद्र सरकारने (central government) बंदी घातली आहे.
हेही वाचा: उल्हासनगर : अकस्मात मृत्यूचे खुनात रूपांतर; दोघांवर गुन्हा, एकाला अटक
देशातील ड्रोनच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. बंदीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीनमधून खेळणी आणि इंधन पंपाच्या नावाने हा ड्रोनचा साठा जेएनपीटी बंदरामार्गे एका एजन्सीमार्फत आयात करण्यात आला होता, अशी खबऱ्याकडून गुप्त माहिती मिळाली होती. ‘न्हावा शेवा’ या सांकेतिक नावाने ड्रोनची तस्करी केली जात होती. याआधीही जेएनपीटी बंदरातून चीनमधून आयात करण्यात आलेल्या १४.११ लाख किमतीचा ३६ ड्रोनचा साठा जप्त करण्यात आला होता.
Web Title: Nhava Sheva Crime Intelligence Unit Seized Twelve Hundred China Made Drone Uran Crime Update
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..