उरण : घटस्फोटीत पत्नीचा न्यूड व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या पतीवर गुन्हा | crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
उरण : घटस्फोटीत पत्नीचा न्यूड व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या पतीवर गुन्हा

उरण : घटस्फोटीत पत्नीचा न्यूड व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या पतीवर गुन्हा

मुंबई : उरणमध्ये एका व्यक्तीनं त्याच्या २९ वर्षीय घटस्फोटीत पत्नीचा (Divorce) न्यूड व्हिडिओ पॉर्न वेबसाईट्सवर लिक केला. त्यानंतर हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर (video viral) व्हायरल झाला. याप्रकरणी पीडित महिलेनं न्हावाशेवा पोलीस स्टेशनमध्ये (Nhava sheva police station) घटस्फोटीत पतीविरोधात तक्रार (police compliant) दाखल केलीय. पोलिसांनी आयटी कायद्याच्या सेक्शन 2000, सेक्शन 66 E आणि सेक्शन 67A अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. (nhava sheva police filed a complaint against a man posting ex wife nude video on porn websites)

हेही वाचा: राजस्थान : सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार; शिक्षक गजाआड

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित महिला आणि तिच्या पतीची २०१३ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. कुटुंबियांच्या संमतीनंतर त्या दोघांनी २०१६ मध्ये लग्न केलं. लग्नाच्या आधी २०१५ मध्ये आरोपीने त्याच्या प्रेयसीसोबत व्हाट्सअॅपवर रोमँटिक चॅटिंग केलं. तिला तिचे न्यूड व्हिडिओ व्हाट्सअॅपवर पाठवायला सांगितले. दोघेही लग्न करणार असल्यानं पीडित महिलेनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याला न्यूड व्हिडिओ व्हाट्स अॅपवर पाठवले. मात्र, लग्नानंतर पीडित महिलेला तिच्या पतीने आणि कुटुंबियांनी त्रास दिला.

त्यानंतर त्या महिलेनं जून २०२१ मध्ये तिच्या पतीसोबत (आरोपी ) घटस्फोट घेतला. ३ जानेवारीला पीडित महिलेला आणि कुटुंबियांना न्यूड व्हिडिओ व्हायरल झालं असल्याचं कळलं. त्यानंतर पीडित महिलेनं तिच्या कुटुंबियांसोबत पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या पतीनं तिचे न्यूड व्हिडिओ अश्लील वेबसाईट्सवर अपलोड करुन तिची बदनामी केली. असं महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे.

याप्रकरणाबाबत न्हावाशेवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भाटे यांनी सांगितलं की, "आरोपी फरार आहे. संगणक किंवा मोबाईल अशा कोणत्या डिवाईसच्या माध्यमातून न्यूड व्हिडिओ पॉर्न वेबसाईट्सवर अपलोड केले, त्याची माहिती सायबर सेल गोळा करत आहे. त्यानंतर पीडित महिलेनं केलेल्या तक्रारीची खात्री होईल. आरोपीला पकडल्यानंतर त्याच्याकडून मोबाईल जप्त केल्यावर त्याने व्हिडिओ डिलिट केले असल्यास फॉरेनसीक लॅबद्वारे त्याच्या मोबाईलमधला डेटा परत मिळवला जाईल."

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Crime NewsRaigad
loading image
go to top