esakal | बार मालकांकडून कोट्यवधींची वसुली, उद्या ED ची टीम वाजेची जबानी नोंदवणार
sakal

बोलून बातमी शोधा

sachin-waze 2.jpg

बार मालकांकडून कोट्यवधींची वसुली, उद्या ED ची टीम वाजेची जबानी नोंदवणार

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: बर्खास्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाजेची (sachin waze case) तळोजा कारागृहात जाऊन जबानी नोंदवण्यास ईडीला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टाने (NIA) परवानगी दिली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil deshmukh) यांच्यावरील आर्थिक अफरातफरीच्या (money laundering) आरोपांच्या प्रकरणात ही जबानी नोंदवण्यात येणार आहे. उद्या शनिवारी वाजेची जबानी नोंदवण्यासाठी ईडीची टीम नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जाणार आहे. (NIA court allows ED to record Sachin Vazes statement in in money laundering case against Anil deshmukh)

वेगवेगळ्या बार मालकांना जबानी नोंदवण्यासाठी आम्ही बोलावले होते. त्यांनी गुडलक म्हणून डिसेंबर २०२० मध्ये वाझेला ४० लाख रुपये दिल्याचे सांगितले. त्यावेळी वाझू CIU चा प्रमुख होता. तपास यंत्रणेने कोर्टाला ही माहिती दिली. बार मालकांनी मुंबई पोलीस झोन १ ते ७ आणि ८ ते १२ यांना अनुक्रमे १.६४ कोटी आणि २.६६ कोटी रुपये दिले. ईडीने कोर्टाला ही माहिती दिली.

हेही वाचा: करुन दाखवलं! अलिबागमधल्या 'या' गावाने कोरोनावर मिळवला विजय

"हे पैसे अमुक-अमुक माणसाकडे जाणार आहेत, असे सचिन वाझेने बार मालकांना सांगितले. डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ मध्ये ४.७७ कोटी स्वीकारल्याचे वाझेनेही मान्य केले आहे. हे पैसे त्याने कुंदन शिंदेकडे दिले" ईडीच्या वकिलाने कोर्टाला ही माहिती दिली. मुंबईत मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानबाहेर सापडलेल्या कार स्फोटक प्रकरणात एनआयएने मार्च महिन्यात सचिन वाजेला अटक केली होती. अँटिलिया बाहेर स्फोटकांनी भरलेली कार पार्क करण्याच्या प्रकरणात सचिन वाजे मुख्य आरोपी आहे. मन्सुख हिरेन हत्या प्रकरणातही वाजे आरोपी आहे.

loading image