esakal | करुन दाखवलं! अलिबागमधल्या 'या' गावाने कोरोनावर मिळवला विजय
sakal

बोलून बातमी शोधा

 corona free

करुन दाखवलं! अलिबागमधल्या 'या' गावाने कोरोनावर मिळवला विजय

sakal_logo
By
नरेश शेंडे

नवी मुंबई: कोविडच्या आजारावर मात करण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक (Corona guidelines) नियमावली जाहीर करण्यात आली. कोविड संसर्गाला (Corona Infection) आटोक्यात आणण्यासाठी कोविड नियमांचे पालन करने बंधनकारक आहे. मात्र, काही ठिकाणी अजूनही कोविडचे नियम (corona rules unfollow) पायदळी तुडवले जात आहेत. परिणामी, कोविडचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. परंतु, रायगड जिल्ह्यातील अलिबाग (Alibuag) तालुक्यातील वाघोली (Wagholi) गावाने कोरोनावर मात केली आहे, असं म्हणायला हरकत नाही. मागच्यावर्षी कोरोना साथीचा संसर्ग सुरु झाल्यापासून अलिबागमधील वाघोली वाडीत (Wagholi Hamlet) आजतागायत एकही कोरोनाबाधित रुग्ण (No Corona patient) आढळलेला नाहीये. यामागचं कारण म्हणजे त्या वाडीतील ग्रामस्थांनी कोरोना आजाराला गांभीर्याने घेतलं आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन केले. ( Alibuag wagholi hamlet no corona patient found till date corona free village )

या वाडीत ६० घरे असून ३०० माणसांची लोकवस्ती येथे आहे. परगावातून येणाऱ्या नागरिकांवरही इथे विशेष लक्षं ठेवलं जातं. कोरोनाबाबतच्या नियमांचं त्यांनाही पालन करायला लावलं जातं. "कोविडच्या माहामारीत लॅाकडाऊन जाहीर केल्यापासून हे ग्रामस्थ कोविड नियमांचे पालन करत आले आहेत. त्यांनी कोरोनापासून सुरक्षित राहण्याला पहिलं प्राधान्य दिलं आहे."अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: भयानक! बक्षीस दिलं नाही, मुंबईत तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या बाळाची केली हत्या

"वाघोली वाडीतील ग्रामस्थ नातेवाईकांना आरोग्य तपासणी केल्याशिवाय वाडीत प्रवेश देत नाहीत. जर कुणी आजारी झाल्याचे समोर आल्यास त्या नातेवाईकाला त्याच्या गावी परत पाठवतात किंवा त्याला आरोग्य तपासणी करुन घ्यायला सांगतात. या ग्रामस्थांच्या आरोग्याच्या शिस्तीमुळे वाडीत कोरोनाचा संसर्ग झाला नाहीये.'' अशी माहिती वाघोलीच्या आरोग्य उपकेंद्रातील डॅा. अनिकेत म्हात्रे यांनी दिली आहे.

"आतापर्यंत वाडीतील पाच ग्रामस्थांचं लसीकरण झालं आहे. नैसर्गिकच येथील ग्रामस्थांची रोगप्रतिकारकशक्ती उत्तम आहे. कोरोना नियमांचे तंतोतंत पालन वाडीतील ग्रामस्थ करतात'' अशी माहिती शासकीय अधिकारी विज्ञान मोकल यांनी दिली आहे.

loading image