esakal | आधी तुमच्याशी गोड गोड बोलतात, मग हळूच घाबरवतात, एकदा तुम्ही घाबरलात की...
sakal

बोलून बातमी शोधा

आधी तुमच्याशी गोड गोड बोलतात, मग हळूच घाबरवतात, एकदा तुम्ही घाबरलात की...

राज्यात सायबर गुन्ह्यात वाढ, 211 जणांना अटक

आधी तुमच्याशी गोड गोड बोलतात, मग हळूच घाबरवतात, एकदा तुम्ही घाबरलात की...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनानं राज्यभरात हाहाकार माजला आहे. त्यातच राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सोमवारपासून सुरु झाला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट आणि अफवा पसरवल्या जात आहे. राज्यामध्ये काही गुन्हेगार आणि समाजकंटक लॉकडाऊनचा असा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर विभागानं कठोर पावले उचलली असून राज्यात 395 गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या गुन्ह्यात 211 जणांना अटक करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाबाबत मोठी अपडेट

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात महाराष्ट्र राज्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये एकूण 395 गुन्ह्यांची (ज्यापैकी 17 N.C आहेत) नोंद 17 मे 2020 पर्यंत झाली आहे.

सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पसरवणं, टिकटॉकवर वादग्रस्त व्हिडिओ तयार करणं, फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून अफवा पसरवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. या अफवांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून, त्यात व्हॉट्सअॅपवरील 169, फेसबुक 154, टिकटॉक 18, ट्विटर 7 आणि इंस्टाग्रामवरील चार गुन्ह्यांचा समावेश आहे. तर ऑडिओ, व्हिडीओ क्लिप आणि यूट्यूब व्हिडीओमध्ये छेडछाड करून त्याचा गैरवापर केल्याप्रकरणी 43 गुन्हे दाखल केलेत. याप्रकरणी 211 लोकांना अटक करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून भाजपचं राज्यभर 'महाराष्ट्र बचाओ आंदोलन'

कोरोना व्हायरशी एका विशिष्ट समुदायाचा संबंध असल्याचा टिकटॉक व्हिडीओ तयार केल्याप्रकरणी हिंगोलीत 7 गुन्हे नोंदवण्यात आलेत. याबाबत सायबर पोलिसांच्या मार्फत तपास सुरू करण्यात आला आहे. सायबर पोलिसांना 102 आक्षेपार्ह पोस्ट्स हटविण्यात यश आलंय. या गुन्ह्यातील आरोपींनी कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देणारा टिकटॉक व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ विविध सोशल मीडियावरून प्रसारित केला होता.

या गुन्ह्यांचा आकडा पाहिल्यास सर्वाधिक गुन्हे हे बीडमध्ये नोंदवण्यात आलेत. 38 गुन्हे बीडमध्ये दाखल झालेत. त्यानंतर पुणे ग्रामीण (30), जळगाव 29 तर मुंबईत 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सायबर पोलिसांचं आवाहन 

लॉकडाऊनच्या कालावधीत कुणीही अफवा पसरवू नये. आलेल्या माहितीची शहानिशा केल्याशिवाय कोणतीही पोस्ट व्हायरल करू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 

मुलांकडे लक्ष द्या

सध्या लॉकडाऊनच्या काळात 8-17 या वयोगटातील मुलं, स्वतःच्या घरातील डेस्कटॉपवरून तर कधी आपल्या पालकांच्या लॅपटॉप किंवा मोबाईलवरून इंटरनेटचा वापर सर्रासपणे करताना दिसत आहेत. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विशेषतः पालकांना विनंती करते की कृपया आपले पाल्य ऑनलाईन काय आणि कोणती वेबसाईट्सवर सर्फिंग करत आहेत यावर लक्ष ठेवा. त्यांना ऑनलाईन कोणी काही फसवत नाही आहे याची खबरदारी घ्या, असंही पोलिसांनी सांगितलं आहे. 

कचरा वर्गीकरणाची व्याख्या बददली, आता 'या' पद्धतीने करायचं कचऱ्याचं वर्गीकरण, नाहीतर...

शक्यतो आपल्या ऑफिसचा लॅपटॉप वा मोबाईल आपल्या पाल्यास हाताळायला देऊ नका. तसेच जर कोणी आपल्या पाल्यास ऑनलाईन फसवत असेल किंवा त्रास देत असेल आणि आपल्या पाल्याने जर आपणास हे सांगितले तर त्याची तक्रार जवळच्यच्या पोलिस स्टेशनमध्ये ताबडतोब द्या किंवा   http://www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर नोंदवा, असं आवाहन महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केलं आहे. 

सायबर विभागाचे ​विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, लॉकडाऊन संदर्भात फक्त राज्य आणि केंद्र सरकार अधिकृतरित्या जी माहिती आणि नियमावली वेळोवेळी प्रसिद्ध करतील, त्यावरच विश्वास ठेवा आणि गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका.

amid corona cyber crime increased in state 211 people arrested by maharashtra police 

loading image